सांगोला शहरातील भटक्या जनावरांसाठी कोंडवाडा तयार! सांगोला नगरपरिषद बुलेटिन जुलै २०२४
◼️सांगोला शहरात महिला व बालकल्याण विकास विभाग आणि सांगोला नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आज अखेर एकूण 2227 अर्जापैकी पैकी 1856 अर्ज ऑनलाइन भरले गेले आहेत.
अर्ज भरण्यासोबतच यापूर्वी भरण्यात आलेले ऑनलाइन अर्जाची पडताळणी करण्याचे काम देखील सुरू आहे. शहरात अंगणवाडी केंद्र, नगर परिषद कार्यालय अर्ज भरण्याचे काम सुरू आहे.
◼️देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर असायला हवे ह्या हेतूने शहरातील गरिबांसाठी "प्रधानमंत्री आवास(शहरी)" या योजनेची सुरुवात डिसेंबर 2015 रोजी करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या या योजनेची सांगोले नगपरिषदे मार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
आजअखेर सांगोला शहरात एकुण २०३ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून ४८ घरकूल पूर्णत्वास येत आहेत.
या योजनेत पात्र लाभार्त्याला स्वतःच घर बांधण्यासाठी राज्य शासनाचे 1 लाख व केंद्र शासनाचे 1.5 लाख असे एकूण 2.5 लाख वितरित करण्याची तरतूद आहे.
सांगोले नगरपरिषदेचा एकुण ५५ लाभार्त्यांचा ५ वा सविस्तर प्रकल्प अहवालास ऑक्टोबर २०२३ रोजी शासना कडून मंजुरी मिळालेली आहे.
राज्य शासनाचे १ लक्ष प्रमाणे अनुदान नगरपरिषदेस मंजुर झाले आहे. माहे जूलै २०२४ अखेर 10 पात्र लाभार्थ्यांना बांधकाम प्रगतीच्या टप्प्यानुसार 60,000 रुपये प्रमाणे अनुदान बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.
◼️ सांगोला नगरपरिषद हद्दीमध्ये 15264 मालमत्ता धारक असून अद्यापही बऱ्याच मालमत्ताधारक यांनी नोंदी नगरपरिषदेकडे केल्या नसल्याने नगरपरिषदेकडून वार्षिक पुरवणी कर आकारणी ची मोहीम हाती घेण्यात आली आहे.सांगोला नगरपरिषद हद्दीतील ज्या मालमत्तांची अद्याप पर्यंत नगरपरिषदेकडे नोंद करण्यात आलेली नाही
त्यांची नोंद करून नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होणे हा यामागील उद्देश आहे. जेणेकरून नगरपालिकेमार्फत करण्यात येणारी विकासकामे व नागरिकांना चांगल्या सोयी देता येतील. त्यास अनुसरून आजपर्यंत 440 नवीन मालमत्ताची मोजणी नगरपरिषदेच्या कर विभागाकडून करण्यात आली आहे.
◼️ नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून नालेसफाई करणे, तुंबलेल्या गटारी स्वच्छता करणे, तसेच दैनंदिन स्वच्छतेची कामे करण्यात येत असून साथीच्या रोगाना आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
◼️ सांगोला शहरातील भटक्या जनावरांसाठी कोंडवाडा तयार करण्यात आला आहे.
◼️सांगोला नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत वासुद रोड पाण्याची टाकी येथे नवीन नर्सरी तयार करण्यात आली आहे. तसेच बनकर वस्ती येथे वृक्षारोपण करण्यात आले.
◼️एकल प्लास्टिक वापरास बंदी मोहिम सांगोला शहरात राबविण्यात येत असून प्लास्टिक बंदी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
◼️ सांगोला शहराच्या मलनिःसारण ( भुयारी गटार योजना )टप्पा क्रमांक 1 चे काम प्रगतीपथावर सुरू आहे. सदर योजनेअंतर्गत 31 जुलै 2024 पर्यंत शहरात विविध ठिकाणी HDPE DWC 200 mm व्यासाची पाईप लाईन 19.68 किमी, HDPE DWC 250 MM व्यासाची पाईप लाईन 115.5 मीटर टाकण्यात आली आहे. तसेच 591 Manhole पूर्ण झाले असून 623 Manhole चे काम सुरू आहे.
◼️सांगोला नगरपरिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या केंद्रशासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) या योजनेंतर्गत महिला सक्षमीकरण व त्यांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम घेतले जातात. या अनुषंगाने सांगोला शहरामध्ये २०० पेक्षा अधिक स्वयंसहाय्यता महिला बचत गट स्थापन करण्यात आलेले आहेत.
बचत गटांना अंतर्गत कर्ज व्यवहारासाठी नगरपरिषदेच्या वतीने र.रु. १००००/- इतका फिरता निधी अनुदान म्हणून दिला जातो. त्याच प्रमाणे ज्या बचत गटांना स्थापन होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला असेल अशा बचत गटांना बँकेच्या सवलतीच्या व्याज दराने नगरपरिषदेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या योजनेच्या माध्यमातून शहारातील महावीर व शिवसमर्थ या स्वयंसहायता महिला बचत गटांना महाराष्ट्र बँकेच्या माध्यामातून व्यवसाय वाढीसाठी अनुक्रमे र.रु. ८ लक्ष व ५ लक्ष इतक्या कर्जाचे वितरण मा.मुख्यधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.
◼️नगरपरिषदेच्या विद्युत विभागामार्फत शहरातील ४००० स्ट्रीट लाईट्सचे देखभाल दुरुस्तीचे काम नियमित सुरू असून कोणतीही लाईट तक्रार दोन दिवसात नियमितपणे निर्गत केली जात आहे.
सांगोले नगरपरिषद हदृीत नागरी दलित्तेतर सुधारणा योजनेअंतर्गत स्ट्रीट लाईट सोय नसलेल्या शहरातील विविध भागात 369 पोल उभा करणेत आलेले असून स्ट्रीट लाईट व्यवस्था करण्यात येत आहे.
◼️नगरपरिषदेच्या बांधकाम विभागामार्फत पठाणबाबा दर्गाचे भूमिपूजन करण्यात आले. सदर दर्गाचे 121 चौ.मी. बांधकाम असून त्यासाठी प्रस्तावित रक्कम 24.26 लक्ष रू. एवढी आहे.
तसेच कोपटे वस्ती येथे 73 चौ.मी. क्षेत्राचे व 24.74 लक्ष एवढ्या प्रस्तावित रक्कमेच्या सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले.
0 Comments