सांगोला मिरज रोड वरील रेल्वे गेट क्र. ३२ एए दुरूस्त करणे बाबत...
रेल्वे स्टेशन मास्तर साहेब,यांना शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून निवेदनाद्वारे विनंती
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोले शहरातील मिरज रोडवरील रेल्वे बोगदा गेट क्र. ३२ एए हा सांगोले शहरातील झालेल्या पावसामुळे मोठया प्रमाणात खड्डे व पाणी साचून राहत आहे.
त्यामुळे सांगोला शहरातील नागरीकांना व शाळेतील विद्यार्थी, वयोवृध्द व नागरीक यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे
व पाणी साचल्यामुळे जिव मुठीत धरून जावे लागत आहे व अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
तरी सदरचा रेल्वे गेट क्र. ३२ एए हा खड्डेमुक्त व पाण्याचा निचरा करून त्वरीत मिळावा.
तसेच सांगोला महूद रोडवरील रेल्वे गेट मधून येणारे जाणारे नागरीकांना काटेरी झुडुपाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
तरी काटेरी झुडुपे लवकरात लवकर काढून टाकावी. सदरचा रेल्वे गेट क्र. ३२ एए हा बोगदा खड्डेमुक्त करण्याची मागणी
सांगोला शहरातील नागरीकांनी आमच्या संस्थेकडे केल्याने संस्था त्वरीत आपणास निवेदनाद्वारे विनंती करीत आहे.
0 Comments