ब्रेकिंग न्यूज..सांगोला नगरपालिकेची जुनी इमारत ब्रेकरवर कोसळली
शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२
सांगोला : सन १९७९ साली उद्घाटन झालेली सांगोला नगरपालिकेची जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू आहे.
ब्रेकरच्या माध्यमातून इमारतीच्या कॉलमला हादरा देऊन पाडण्याचे काम सुरू असताना अचानक इमारतीचा मुख्य भाग खाली कोसळला. दरम्यान, या इमारतीतील काही भाग ब्रेकरवर पडला.
यावेळी ब्रेकरमधील कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्याने थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे, तर ब्रेकरचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहेत.
इमारतीचे उद्घाटन सन १९७९ साली लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात झाले. अवघ्या तीन लाख रुपयांत बांधलेल्या या इमारतीला ४५ वर्षे पूर्ण झाली होती. या तीन मजली इमारतीमध्ये एक नंबर खिडकी.
मख्याधिकारी. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती, स्वच्छता समिती सभापती, बांधकाम समिती सभापती यांच्यासह नगरसेवक हॉल, सभागृह यासह कर विभाग,
बांधकाम विभाग, विद्युत विभाग आदी मागील अनेक वर्षांपासून आहेत. इमारतीवरील पाण्याची टाकी मोठ्या प्रमाणात गळत असल्याने मागील काही कालावधीमध्ये नगरपालिकेच्या डाव्या बाजूचा काही भाग कोसळला होता.
यासह ही इमारत धोकादायक असल्याची बाब समोर ठेवून व नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी पालिका प्रशासनाने नगरपालिकेची जुनी प्रशासकीय इमारत पाडण्यासाठी सोलापूर येथील ठेकेदारास देण्यात आली.
मागील काही दिवसांपासून इमारत पाडण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून प्रयत्न सुरू आहेत. इमारत पाडण्यासाठी ब्रेकरद्वारे प्रयत्न सुरू असताना ब्रेकरने कॉलमला हादरा दिला. यावेळी इमारतीचा वरचा प्रमख भाग खाली कोसळला.
0 Comments