खळबळजनक... सुट्टीवर आलेल्या जवानावर पत्नीकडून विषप्रयोग; १५ दिवसांनी जवानाचा मृत्यू!
कोल्हापूर : १५ दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या अमर देसाई या जवानाला त्यांची पत्नी आणि प्रियकराने हातपाय बांधून विष पाजून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या या जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१८ जुलै रोजी जवान अमर देसाई सुट्टीवर आले असता झोपेत असताना त्यांच्या पत्नी आणि प्रियकराने त्यांचे हातपाय बांधून त्यांना विष पाजले. हा प्रकार सुरू असताना त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला
आणि शेजारी राहणारे लोक त्यांच्या मदतीला धावले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
डॉक्टरांनी त्यांचे त्यांचे प्राण वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण शेवटी उपचारादरम्यान १५ दिवसांनी त्यांची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेने संपूर्ण कोल्हापुरात संताप व्यक्त केला जात आहे.
जम्मू काश्मीरमध्ये अमर देसाई सेवा बजावत होते. गेल्या महिन्यात सुट्टीसाठी आले असता त्यांच्या पत्नी आणि प्रियकराने त्यांचे
हातपाय बांधून त्यांना विष पाजले. पत्नी आणि तिच्या प्रियकराने विष प्रयोग केल्याचे लक्षात येताच त्यांनी अमर देसाई यांनी आरडा ओरडा करण्यास सुरूवात केली.
शेजारी राहणारे काही लोक त्यांच्या मदतीला धावले त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्याचवेळी पत्नीच्या प्रियकराने घरात आलेल्या व्यक्तीला जोरदार धक्का दिला आणि तिथून पळ काढला.
शेजारी नागरिकांनी अमर देसाई यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तर त्यांच्या पत्नीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पण आज अखेर अमर देसाई यांची मृत्यूशी झुंज संपली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
0 Comments