सर्वात जलद निकाल! सोलापूरच्या जिल्हा न्यायालयाकडून नराधमाला 2 महिने 28 दिवसांत फाशीची शिक्षा;
पोटच्या 13 महिन्यांच्या मुलीवर बापानेच केला होता अत्याचार
लापूर : राजस्थानातून सिकंदराबाद येथे जगायला गेलेल्या धोलाराम बिष्णोई या निर्दयी बापानेच १३ वर्षाच्या चिमुकलीवर
अत्याचार करून तिचा खून केला होता. त्यावेळी पत्नी पुनिकुमारी हिने साथ दिली.या दोघांनाही फास्ट ट्रॅक कोर्ट नव्हे
सोलापूरच्या पोक्सो विशेष कोर्टाचे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी फाशीची शिक्षा ठोठावली. आरोपींना अवघ्या दोन महिने २८ दिवसांत शिक्षा होण्यासाठी
जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी अथक परिश्रम घेतले होते. बदलापूर दुर्घटनेच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा न्यायालयात सर्वाधिक जलद चाललेल्या या खटल्याची सर्वांनाच आठवण झाली.
दारूच्या नशेत जन्मदात्या पित्यानेच १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. ओरडणाऱ्या चिमुकलीच्या तोंडात कापड कोंबून त्याने अत्याचार केले होते.
त्यावेळी चिमुकलीच्या आईने देखील बघ्याची भूमिका घेतली. मुलीचा खून करून तिचा मृतदेह घेऊन दोघेही राजकोट-सिकंदराबाद एक्स्प्रेसने राजस्थानच्या दिशेने निघाले होते.
पण, रेल्वेच्या त्या डब्यातील एका महिला प्रवाशाने तिच्या जागेवर ठेवलेल्या मुलीला घ्यायला सांगितले. त्यावेळी त्या चिमुकलीचे दोन्ही हात लोंबकाळत असल्याने महिला प्रवाशाला संशय आला.
त्यांनी प्रसंगावधान साधून तिकीट तपासणीस यांना माहिती सांगितली. त्यावेळी वाडी स्थानकाशी संपर्क करण्यात आला. तेथून सोलापूर स्थानकावर उतरल्यावर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले
व चिमुकलीची वैद्यकीय तपासणी झाली. त्यावेळी ती मृत असल्याचे सांगितले. त्यावरून ४ जानेवारी २०२२ रोजी त्या दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
साधारणत: मार्चअखेर हा खटला न्यायालयासमोर आला. त्यानंतर अवघ्या दोन महिने २८ दिवसांतच (२ जून २०२२ रोजी) या गुन्ह्याचा निकाल लागला व निर्दयी बापासह त्या चिमुकलीच्या आईला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती.
अवघ्या ९ दिवसांत ३१ साक्षीदारांची तपासणी
क्रूर कृत्य करून पळून जाण्याच्या तयारीतील चिमुकलीच्या माता-पित्यांना कठोर शिक्षा व्हावी, म्हणून जिल्हा सरकारी वकील राजपूत यांनी कायद्याचा कस पाडला. त्यांनी अवघ्या ९ दिवसांतच गुन्ह्यातील ३१ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
मुख्य साक्षीदार महिला नेपाळची होती, त्यामुळे त्यांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविण्यात आली. अखेर न्यायालयाने त्या दोन्ही आरोपींना तीन महिन्याच्या आत फाशीची शिक्षा ठोठावली.
चिमुकलीला न्याय मिळाल्याचे समाधान
पोटच्या १३ महिन्याच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या बापाला व आईला फाशीची शिक्षा होण्यासाठी युक्तिवाद केला.
केस कोर्टात आल्यानंतर दोन महिने २८ दिवसांत त्या दोघांनाही पोक्सो विशेष कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली. त्या चिमुकलीला काही दिवसांत न्याय मिळवून देता आल्याचे समाधान आहे.
- प्रदिपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील, सोलापूर
0 Comments