नॅचरोपॅथी, अल्टरनेटीव मेडिसिन व इलेक्ट्रो होमिओपॅथी, CMS & Ed डॉक्टरांना क्यूआर कोड
हजारो डॉक्टरांना मिळणार क्यूआर कोड बोगस डॉक्टर म्हणून होणारे कारवाई थांबणार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
मुंबई : बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटामुळे अनेकदा वैद्यकीय क्षेत्राची बदनामी होते, रुग्णांची हेळसांड होते. प्रसंगी जीवही जातो. या सगळ्याला आळा घालण्यासाठी आयुष भारत
डॉक्टर असोसिएशन सर्व कायदेशीर रित्या प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना आता क्यूआर कोड देणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केला की डॉक्टर खरा की बोगस, हे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना लगेच समजू शकणार आहे.
महाराष्ट्र शासनाकडे बोगस डॉक्टरांच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून येत आहेत. त्यावेळेस काही ठिकाणी अचानक छापेमारी झाल्यामुळे काही डॉक्टरांची कागदपत्रे तसेच केंद्र शासन व राज्य शासन यांचे आदेश व न्यायालयाचे आदेश
न पाहता बेकायदेशीर पद्धतीने कारवाई करण्यात आल्या आहेत यामध्ये सर्वसामान्य डॉक्टरांवरती चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आले आहे त्यामध्ये त्यांची बदनामी सर्वसामान्य डॉक्टरांना सहन करावी लागत आहे
बोगस डॉक्टर या शब्दाला आळा घालण्यासाठी आयुष भारत डॉक्टर असोसिएशन ने क्यू आर कोड घेऊन येणार आहे यामध्ये हजारो डॉक्टरांना संरक्षण मिळणार आहे
तसेच मानसन्मनाने प्रॅक्टिस करू शकणार आहेत हा एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला क्यूआर कोड दिला जाणार आहे.
त्यामध्ये सर्व डॉक्टरांची माहिती व शिक्षण तसेच राज्य शासन व केंद्र शासनाचे नोटिफिकेशन व आदेश उपलब्ध असतील, या उपक्रमावर सध्या काम सुरू असून, लवकरच नागरिकांच्या व डॉक्टरांच्या सेवेत ही योजना येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
६२००० हजारांहून अधिक डॉक्टर आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे सदस्य आहेत. आपण ज्या डॉक्टरकडे उपचार घेत आहोत, त्याची संपूर्ण माहिती रुग्णांना असायला हवी. त्यामुळे रुग्णाला आपण कोणत्या डॉक्टरांकडे उपचार घेत आहोत
याची माहिती मिळेल. क्यूआर कोडमुळे बोगस डॉक्टरांना आळा घालणे शासनाला सहज शक्य होणार आहे - डॉ.अमीर मुलाणी राष्ट्रीय अध्यक्ष : आयुष भारत डॉक्टर असोसिएशन
0 Comments