नीरा उजवा कालव्यातून लाभक्षेत्रातील सिंचनासाठी आवर्तन सुरू - आ.शहाजीबापू पाटील
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (तालुका प्रतिनिधी): नीरा देवधर प्रकल्पातून सांगोला, पंढरपूर तालुक्यासाठी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्याच्या आमदार शहाजीबापूंच्या मागणीची दखल घेतली आहे.
पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पाण्याची तसेच शेतीच्या पाण्यासाठी नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. मैल ९३ जवळ ४८० क्युसेसचा विसर्ग सुरु आहे. लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार
असून तिसंगी तलावात ३५० क्युसेसने विसर्ग सुरु आहे. सांगोला शाखा क्रमांक ५ ला आवर्तन सुरू झाल्यावर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून देणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यात शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नीरा उजवा कालव्यामधून पाणी सोडून
लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी तसेच तिसंगी, चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेचे
आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याकडे केली होती.
या मागणीची दखल घेत तात्काळ नीरा उजवा कालव्यातून सांगोला, पंढरपूर तालुक्यासाठी आवर्तन सुरू केले आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतीला लाभ होणार असून शेतातील जळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत.
नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचे वाटप करत असताना पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या सांगोला तालुक्याला तसेच तिसंगी
तलावासाठी प्राधान्याने पाणी सोडण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी नीरा उजवा कालव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार असून तिसंगी तलावात ३५० क्युसेसने विसर्ग सुरु आहे. सांगोला शाखा क्रमांक ५ ला आवर्तन सुरू झाल्यावर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार आहे.
तसेच गेल्या आवर्तनात ज्या फाट्यांना पाणी मिळाले नाही, त्या फाट्यांना या आवर्तनात प्राधान्याने पाणी देण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
0 Comments