खळबळजनक! सांगोला ज्वेलर्स व्यवसायिकाला मंगळवेढ्यात बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले;
१० लाख रुपये घेवून बनावट सोने देवून केली आर्थिक फसवणूक; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 8208284647/9503487812)
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे ते मुंढेवाडी मार्गावरील कॅनॉलवर सांगोला येथील एका ४६ वर्षीय ज्वेलर्स व्यवसायिकाला बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून १० लाख रुपये घेवून बनावट सोने देवून
आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अमित भोसले, सुरज भोसले, संदिप भोसले, रवी काळे, रणजित (रा. जत), तेजस शिर्के (रा. सांगोला) या सहा जणांविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी गणेश भजनदास शिंदे (वय ४६, रा. कडलास रोड, सांगोला) हे ज्वेलर्स व्यवसायिक असून दि.९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० वा.
बोराळे ते मुंढेवाडी मार्गावरील कॅनॉलवर वरील आरोपींनी फिर्यादीस बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून रोख रक्कम १० लाख रुपये घेवून त्या बदल्यात बनावट सोने देवून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली
असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून दि.२६ जुलै रोजी २.५६ वा. मंगळवेढा पोलिसात गुन्हा सदर आरोपीविरूध्द दाखल झाला आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अंकुश वाघमोडे हे करीत आहेत.
0 Comments