खळबळजनक..सांगोला बाजार समिती परिसरात जातोय नर वासरांचा बळी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भरणाऱ्या जनावरांच्या आठवडा बाजारात व्यापलेल्या संकरित गायींची १० ते १२ नर जातीची वासरे पशुपालक तेथेच सोडून जातात .
गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार घडत आहे. हि नर वासरे भटक्या कुत्र्यांचे भक्ष्य ठरत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवार व रविवार जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो . या बाजारात महाराष्ट्रासह अन्य राज्यातून व्यापारी मोठ्या जनावरांची खरेदी ,
विक्री करण्यासाठी येत असतात .सध्या अनेक शेतकऱ्यांचा शेतीपूरक पशुपालन व्यवसाय मोठा असल्याने या बाजरात संकरीत गायींचा व्यापार देखील मोठ्या प्रमाणात होतो.
बाजार समितीला या जनावरांच्या खरेदी विक्री व्यवहारातून मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील मिळते .परंतु याठिकाणी अतिरिक्त सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही.
नर वासराला गायीचे दूध न मिळाल्याने ते बाजार समिती आवारातच निजपत व्याकुळ होऊन बसलेले असते. अशा वेळी मोकाट कुत्री या नवजात वासरांवर हल्ला करतात .
याच आवारात तालुका कृषी कार्यालय , बाजार समितीचे कार्यलय , धान्याचे व फळांचे व्यापारी देखील आहेत.
कुत्र्यांनी या वासरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली असते याचा त्रास परिसरातील व्यापारी , निवासी नागरिक यांना होत असतो .
त्यामुळे नवजात वासरांना तिथेच सोडून जाणाऱ्यांवरती कृषी उत्पन्न बाजार समितीने करडी नजर ठेऊन योग्य ती कारवाई करावी व नुकतेच जन्मलेल्या नर वासरांचा जीव वाचवावा अशी मागणी केली जात आहे.
0 Comments