ब्रेकिंग! विधानपरिषदेत आई-बहिणीवरून शिव्या
विधान परिषदेतील चर्चेदरम्यान सत्ताधारी बाकांवरील सदस्यांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना सभागृहातून पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीसाठी हा धक्का मानला जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या भाषणाचे पडसाद राज्य विधान परिषदेत उमटले होते.
राहुल यांच्या निषेधाचा ठराव संमत करावा, अशी मागणी भाजपचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्याला प्रसाद लाड यांना पाठिंबा दिला.
हा ठराव संमत करून लोकसभेला पाठवावे व राहुल यांना इटालीला पाठवावे, असे लाड म्हणाले. राहुल यांच्यावर टीका करताना लाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली.
लाड यांच्या टीकेमुळे संतप्त झालेल्या दानवे यांनी लाड यांच्याविषयी अपशब्द वापरले. तसेच बोट दाखवल्यास ते तोडण्याची हिंमत माझ्यात आहे, असे ते म्हणाले.
त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. लाड यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या देऊन दानवे यांच्या निलंबनाची मागणी केली.
सभागृहातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या आग्रहामुळे सभापती नीलम गोऱ्हे यांनी गटनेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
0 Comments