धक्कादायक..पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच हवालदाराने पत्नीचा भोसकून केला खून; छातीवर चाकूने केले सपासप वार
गंभीर जखमी झालेल्या ममता पोलिस अधीक्षक कार्यालयात घुसल्या आणि कोसळल्या.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ ममताना जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
बंगळूर : कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर काल सकाळी हासन पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच हवालदार लोकनाथने आपल्या पत्नीचा चाकूने भोसकून खून केला.
हासन शहराबाहेरील चन्नपट्टण येथे रहाणारी ममता (वय ३८) असे महिलेचे नाव आहे. ममताने १७ वर्षांपूर्वी के. आर. पुरमच्या लोकनाथशी लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत.
अनेक महिन्यांपासून या दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वादावरून वारंवार भांडणे होत होती.
त्यामुळे संतापलेली पत्नी ममता काल (सोमवार) सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात पती लोकनाथ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेली होती.
पत्नी पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्याचा राग मनात धरून हवालदार असलेल्या पती लोकनाथ याने आपल्या पत्नीच्या छातीवर चाकूने वार केले व कार्यालयासमोरून पळ काढला.
गंभीर जखमी झालेल्या ममता पोलिस अधीक्षक कार्यालयात घुसल्या आणि कोसळल्या. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ ममताना जिल्हा रुग्णालयात नेले.
मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून करून पळून गेलेला आरोपी पती लोकनाथ याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
जावई मालमत्तेसाठी, जागेसाठी व पैशासाठी वारंवार त्रास देत असल्याची तक्रार सासरे शामण्णा यांनी केली. पोलिस अधीक्षक मोहम्मद सुजिता यांनी सांगितले
की, कौटुंबिक वादामुळे दोघांमध्ये भांडण झाले होते. काल सकाळी ममता तक्रार देण्यासाठी आल्या असता कार्यालयासमोर हा प्रकार घडला.
0 Comments