धक्कादायक प्रकार ! केवळ अन्नासाठी महिलांना सैनिकांसोबत सेक्स करण्यास भाग पाडले जाते ; पोटाची खळगी भरण्यासाठी होतोय शरीराचा व्यापार, अहवालात धक्कादायक खुलासा -
युद्धग्रस्त सुदानमध्ये मानवतावादी संकट दिवसेंदिवस गहिरे होत चालले आहे. देशातील परिस्थिती अत्यंत भयावह असून महिलांना केवळ अन्नासाठी शरीराचा व्यापार करावा लागत आहे.
सुदानच्या ओमदुरमन शहरात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे की, त्यांना अन्नाच्या बदल्यात सैनिकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात आहे. लढाईनंतर ओमदुरमनमध्ये राहणाऱ्या अनेक महिलांनी सांगितले की,
सुदानी सैन्यातील पुरुषांसोबत सेक्स हाच त्यांना अन्न आणि इतर मूलभूत गरजा मिळण्याचा एकमेव मार्ग आहे. स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांना हे करावेच लागले.
गार्डियनच्या रिपोर्टनुसार, एका पीडित महिलेने सांगितले की, तिचे वृद्ध आई-वडील आणि 18 वर्षांच्या मुलीला अन्न पुरवण्याचे तिच्यासमोर मोठे आव्हान आहे. महिलेने सांगितले, ‘माझे आई-वडील दोघेही खूप वृद्ध आहेत
आणि मी माझ्या मुलीला अन्नाच्या शोधात कधीही बाहेर जाऊ दिले नाही. मी सैनिकांकडे जायचे आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेऊन अन्न प्राप्त करायचे. माझ्याकडे जेवणासाठी दुसरा पर्यायच नव्हता.’
महिलेने पुढे सांगितले की, पूर्वी ती घरात काम करून आपला उदरनिर्वाह करत होती. सैन्य आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यात सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर बहुतेक लोक इतर शहरांमध्ये गेले.
गरिबीमुळे ती तिच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ शकली नाही आणि उदरनिर्वाहाच्या समस्येला तोंड द्यावे लागले. यामुळे तिला सैनिकांशी संबंध प्रस्थापित करावे लागले.
गार्डियनशी बोललेल्या काही महिलांनी सांगितले की, सैनिकांशी सेक्स केल्यानंतर त्यांना अन्न, स्वयंपाकघरातील उपकरणे आणि इतर वस्तू घेण्याची परवानगी देण्यात आली.
ओमदुरमनच्या सैनिकांनी आणि रहिवाशांनी महिलांना सेक्स करण्यास भाग पाडल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. एका सैनिकाने सांगितले की, त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना हे करताना पाहिले आहे.
दरम्यान, सुदानमध्ये सुरू असलेल्या लढाईत हजारो लोकांच्या मृत्यूशिवाय सुमारे एक कोटी लोक विस्थापित झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येला अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे.
एप्रिल 2023 मध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर महिलांवर मोठ्या प्रमाणावर बलात्कार झाल्याच्या बातम्याही समोर आल्या. खार्तूम आणि दारफूरमधील आरएसएफच्यासैनिकांवर मोठ्या प्रमाणात महिलांचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप होता.
0 Comments