साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना तात्काळ भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा लहुजी क्रांती मोर्चा संघटनेची तहसीलदार सांगोला यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना तात्काळ भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी
लहुजी क्रांती मोर्चा संघटनेची तहसीलदार सांगोला यांचेकडे काल मंगळवार दि.२३ जुलै रोजी निवेदनाव्दारे केली आहे. सदर मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार सोमनाथ साळुंखे यांनी स्विकारले.
शोषित, श्रमिक, कामगार आणि वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत
तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बजावलेली भूमिका, दिलेले योगदान हे अमूल्य आहे. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्यजगातील २७ भाषेमध्ये प्रकाशित झालेले आहे.
साता समुद्रापार छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्यशाली इतिहास जगाला ठणकावून सांगणारे व भारत देशाची मान उंचावणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना आजही उपेक्षित ठेवले जात आहे.
राष्ट्रप्रेमाखातर मराठी साहित्याच्या माध्यमातून क्रांतीचे रणशिंगफुंकणारे अण्णा भाऊ साठे यांना तात्काळ भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा.
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने १ ऑगस्ट हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यावा, १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सरकारने सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी,
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे कार्य आणि कर्तृत्व लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना तात्काळ भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा., साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या चिराग नगर येथील घराच्या स्मारकाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा.,
अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या कर्जदारासाठी लागऊकेलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात., क्रांतिवीर फकीरा यांच्या समाधीचा जीर्णोद्धार लवकरात लवकर करण्यात यावा.,
मातंग व तत्सम जातीवरील होत असलेल्या गंभीर अन्याय- अत्याचाराच्या घटनांचा तपास एसआयटीकडे देऊन हे खटले फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे आदी मागण्याही निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे.
निवेदन देते प्रसंगी विनोद रणदिवे, बापूसाहेब ठोकळे, दीपक बनसोडे, सचिन रणदिवे, इरशाद बागवान, अमित साठे, आकाश रणदिवे, रोहित खंडागळे, रोहित रणदिवे, अभिजीत रणदिवे, सुरज रणदिवे, अण्णासो मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
0 Comments