google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महापुराचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तात्काळ तयार करावा - आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

महापुराचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तात्काळ तयार करावा - आमदार शहाजीबापू पाटील

महापुराचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तात्काळ तयार करावा - आमदार शहाजीबापू पाटील


दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यासह मंगळवेढा, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, 

खानापूर तालुक्यातील तलाव भरून देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. म्हैसाळ सिंचन प्रकल्पांचे पाणी थेट शेतीला, 

पिण्यासाठी आणि तेथील भूजल पातळी उंचावण्यास फायद्याचे ठरणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील तलावांची क्षमता पाहून पाणी साठविण्याचे नियोजन करावे. महापुराच्या पाण्याचे नियोजन करुन ते पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा 

आराखडा शासनाने तात्काळ तयार करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

        कृष्णा काठावर एकीकडे महापुराची भिती दाटली असताना दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यासह मंगळवेढा, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, 

खानापूर तालुक्यातील जनता दुष्काळ पडू नये, अशी प्रार्थना करीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा तडाखा बसत आहे.

त्यामुळे महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्याची योजना तयार करण्याची आवश्यकता आहे. महापुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील

 सांगोला तालुक्यासह मंगळवेढा, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर या दुष्काळी भागाला दिल्यास हे तालुके दुष्काळमुक्त होण्यास मदत होणार आहे.

        कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यासह मराठवाड्याला देणे, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसाह्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. 

हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. पुराचे पाणी धरण व्यवस्थापनातून थांबविण्यात येत नाही. आपत्ती व्यवस्थापातून महापुराचे पाणी दुष्काली भागाला देण्यासाठीचा आराखडा तयार झाल्यानंतर

 महापुरात हानीची स्थिती निर्माण होणार नाही. पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाच वेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देणे शक्य होणार आहे. 

        म्हैसाळ योजनातून वर्षभर १३ टीएमसी पाणी उचलण्याची क्षमता आहे. महापुराच्या कालावधीत सहा ते सात टीएमसी पाणी उचलून ते दुष्काळी तालुक्यातील तलावात,

 बंधाऱ्यात सोडण्यात यावे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी

 शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्‍यातील तलावांची, बंधाऱ्यांची क्षमता पाहून, गरज पाहून त्यात पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात यावे. महापुराचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा तात्काळ तयार करण्यात यावा, 

अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments