google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना..शाळेतील सहशिक्षकाने शाळेतीलच सहशिक्षकाच्या डोक्यात घातला लोखंडी टेबल; तालुक्यातील घटना

Breaking News

खळबळजनक घटना..शाळेतील सहशिक्षकाने शाळेतीलच सहशिक्षकाच्या डोक्यात घातला लोखंडी टेबल; तालुक्यातील घटना

खळबळजनक घटना..शाळेतील सहशिक्षकाने शाळेतीलच सहशिक्षकाच्या


डोक्यात घातला लोखंडी टेबल; तालुक्यातील घटना 

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

शाळेतील मुलांची भांडणे का सोडवली म्हणून शाळेतील सहशिक्षकाने शाळेतीलच सहशिक्षकाच्या डोक्यात लोखंडी टेबल  डोक्यात घालून जखमी करत

 चप्पलने मारुन शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना तालुक्यातील  एका प्राथमिक आश्रमशाळेत घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे प्राथमिक आश्रम शाळेत  सह शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. 

दि 16 जुलै 2024 रोजी दुपारी 1 वा.चे सुमारास मुख्याध्यापक यांनी मुलांच्या समस्याकरिता शाळेत मिंटीग बोलवली होती.

 मिटींग संपल्यानंतर फिर्यादी ऑफीसच्या बाहेर येत असताना सहशिक्षकाने तु शाळेतील मुलांची भांडणे का सोडवली असे म्हणून चप्पल घेवून अंगावर धावून आले होते. 

त्यावेळी भांडणे मुख्याध्यापकानी सोडवली होती. याबाबत शाळेचे अध्यक्ष यांना कळवले होते. त्यावेळी त्यांनी मी पुणे येथे आहे आलेवर पाहू असे सांगितले होते.

पुन्हा दि 18 जुलै रोजी दुपारी 12 वाजणेचे सुमारास शाळेचे अध्यक्ष यांनी वरील संदर्भाने मिटींग बोलवली होती. सदर मिंटीग चालू असताना आम्हाला झाले 

प्रकाराबाबत विचारत असताना अचानक त्या सहशिक्षकाने सर्वाच्यासमोर ऑफीसमध्ये फिर्यादी यांच्या गच्चीला धरले त्यावेळी फिर्यादी सहशिक्षक  हे ऑफीसच्या बाहेर पळून

 आल्यावर त्या सहशिक्षकाने याने ऑफीस मधील लोखंडी टेबल उचलून फिर्यादी यांच्या डोकीत घातला. त्यावेळी फिर्यादी यांच्या डोकीतून रक्त आले. त्यानंतर त्या सहशिक्षकाने चप्पलने  मारत

 शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी भांडणे शाळेचे मुख्याध्यापक, अध्यक्ष तसेच सह शिक्षकांनी सोडवली असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments