धक्कादायक.. पंढरपूर विठ्ठलाचे देवदर्शन करुन येत असताना
विहिरीत कोसळली जीप, 6 जणांचा मृत्यू, गाडीत 12 जण असल्याची शक्यता
विठ्ठलाचे देवदर्शन करुन येत असताना विहिरीत कोसळली जीप पंढरपूर येथून दर्शन घेऊन आलेल्या
भविकांना राजूरकडे घेऊन जाणाऱ्या भरधाव काळीपिवळी जीप आणि दुचाकीचा अपघात होऊन जीप विहिरीत कोसळली.
ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास राजूररोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ घडली. या भीषण अपघातात किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे.
तर तीन जणांना जालन्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र राजूर परिसरातील चनेगाव येथील काही भाविक पंढरपूर येथे गेले होते.
विठ्ठलाचे दर्शन घेऊन हे भाविक गुरुवारी जालन्यात पोहोचले. राजूर येथे जाण्यासाठी हे भाविक काळीपिवळी जीपमध्ये बसले.
या जीपमध्ये १५ ते २० प्रवासी होते. दरम्यान, जीप राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळील
खडेश्वर बाबा मंदिर ते वसंत नगर येथे आल्यानंतर भरधाव दुचाकीने जीपला धडक दिली.
या अपघातात जीप रस्त्याच्या बाजूला एका शेतात असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. काही कळण्यापूर्वीच हा अपघात झाल्याने जीपसह सर्व प्रवासी विहिरीत पडले.
चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु करत दहा प्रवाशांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.
या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित तीनजणांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरु होते.
0 Comments