google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! दरोड्याचा बनाव करत 23 वर्षीय महिलेचा केला निघृण खून; पळून जाताना हल्लेखोरांच्या ताब्यातील दुचाकी पोलिसांच्या हाती सोलापूर जिल्ह्यातील घटना...

Breaking News

धक्कादायक! दरोड्याचा बनाव करत 23 वर्षीय महिलेचा केला निघृण खून; पळून जाताना हल्लेखोरांच्या ताब्यातील दुचाकी पोलिसांच्या हाती सोलापूर जिल्ह्यातील घटना...

धक्कादायक! दरोड्याचा बनाव करत 23 वर्षीय महिलेचा केला निघृण खून; पळून जाताना


हल्लेखोरांच्या ताब्यातील दुचाकी पोलिसांच्या हाती सोलापूर जिल्ह्यातील घटना...

एका २३ वर्षीय महिलेचा निघृणपणे खून करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास पोंधवडी-राजुरी

 रस्त्यावरील वस्तीवर घडली. मृत कोमल बिभीषण मत्रे (वय २३,रा. पोंधवडी ता.करमाळा) असे महिलेचे नाव आहे.

कोमलचा विवाह गावातीलच मत्रे कुटुंबात झाला होता. मागील तीन वर्षांपासून कौटुंबिक कलहातून ती माहेरीच राहत होती.

 मंगळवारी रात्री अज्ञात काही हल्लेखोर कोमलच्या घरी आले.

सुरुवातीला त्यांनी दरोड्याचा बनाव केला व कोमलवर निघृणपणे धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या हल्ल्यात ती जागीच ठार झाली. मृत महिलेला एक लहान मूल आहे.

या ठिकाणाहून पळून जात असताना हल्लेखोरांच्या ताब्यात असलेली दुचाकी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे हल्लेखोर लवकरच मिळून येण्याची शक्यता आहे.

सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दळवी, हवलदार बालाजी घोरपडे, 

अझहर शेख यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. घटना रात्री उशिरा समजल्याने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Post a Comment

0 Comments