google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संभाजी नामदेव बाबर कुटुंबीयांचे चोपडीतील लक्ष्मीआई मंदिर नूतनीकरणाचे कार्य आदर्शवत

Breaking News

संभाजी नामदेव बाबर कुटुंबीयांचे चोपडीतील लक्ष्मीआई मंदिर नूतनीकरणाचे कार्य आदर्शवत

संभाजी नामदेव बाबर कुटुंबीयांचे चोपडीतील लक्ष्मीआई मंदिर नूतनीकरणाचे कार्य आदर्शवत


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/ प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील चोपडी गावातील ग्रामदैवत  लक्ष्मीआई मंदिर पूर्वी माती- दगडी काम केलेले व लाकडाचे माळवाद   मोडकळीस आलेले होते. 

 मंदिराची स्थिती पाहून कै . नामदेव जिजाबा बाबर यांचे ज्येष्ठ चिरंजीव संभाजी नामदेव बाबर कुटुंबीयांनी

 धार्मिक व सामाजिक अशा उदात्त हेतूने शिखर व कळसासह संपूर्ण मंदिराचा सन.2002 साली जीर्णोद्धार पूर्ण करून नव्याने भव्य असे मंदिर  पूर्ण केले.

 यावर्षी 2024 मध्ये नुकतेच  लक्ष्मीआई मंदिराचे पुनर्रंगकाम करण्यात आले आहे. संभाजी बाबर यांचे हे कार्य आदर्शवत असून इतरांनाही प्रेरणा देणारे आहे. 

लक्ष्मीआई देवी मंदिराचा 2002 साली केलेला जीर्णोद्धार व यावर्षीचे पुनर्रंगकाम हे छत्रपती शिवाजीनगर येथील संभाजी बाबर यांनी अत्यंत समर्पितपणे व  स्वइच्छेने केले आहे.

 त्याबद्दल चोपडी व पंचक्रोशीतील भाविक भक्ताकडून विशेष कौतुक होत आहे. 

  लक्ष्मीआई मंदिर हे चोपडी आणि नाझरा या दोन गावांच्या शिवेवर वसलेले असून गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या रंगकामामुळे गावच्या वैभवात व सौंदर्यात भर पडली आहे. 

आषाढ व श्रावण महिन्यात भक्ती भावाने येणाऱ्या भक्तांना एक नवा व पवित्र अनुभव मिळेल. या नूतनीकरणामुळे चोपडी आणि नाझरा गावातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments