google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक... सांगोला शहरात 25 हजाराची लाच घेताना पोलीस शिपायासह खाजगी इसम अँटी करप्शनच्या ताब्यात -

Breaking News

खळबळजनक... सांगोला शहरात 25 हजाराची लाच घेताना पोलीस शिपायासह खाजगी इसम अँटी करप्शनच्या ताब्यात -

खळबळजनक... सांगोला शहरात 25 हजाराची लाच घेताना पोलीस शिपायासह खाजगी इसम अँटी करप्शनच्या ताब्यात -


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला(प्रतिनिधी):- दाखल गुन्ह्यात कलम वाढ न करता अटक न करता जामिनावर सोडण्यासाठी 45 हजार रुपये मागून

 तडजोडी करून 25 हजाराची लाच घेणार्‍या पोलीस शिपाई सह खाजगी इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतली आहे.

पोशि सोमनाथ  माने, ब.नं. 2036, नेमणुक सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण व खाजगी इसम  असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.

यातील तक्रारदार यांचे व त्यांचे मुलांचे विरुध्द सांगोला पोलीस ठाणे येथे दखल असलेल्या गुन्हयात कलम वाढ न करुन अटक न करता जामीनवर सोडण्यासाठी व गुन्हयाचे तपासामध्ये मदत करणेसाठी

 पोकॉ/ सोमनाथ माने, नेमणुक सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण व खाजगी इसम  यांनी प्रथम 45000 रुपये लाचेची मागणी केली होती अशी तक्रार प्राप्त झाली.

आज दिनांक 22/07/2024 रोजी पडताळणी कारवाईमध्ये प्रथम 30,000 रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 25000 रुपये लाच रक्कम पोशि सोमनाथ माने 

यांनी स्वीकारण्याचे तयार दर्शवुन सदरची 25000 लाचेची रक्कम खाजगी इसम  यांच्या हस्ते स्वीकारले

 असल्याने दोन्ही आरोपीस ताब्यात   घेऊन त्यांचे विरुध्द सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कारवाई ला.प्र.वि पुणेचे पोलीस अधिक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली  ला.प्र.वि. 

सोलापूरचे  पोलीस उपअधीक्षक श्री. गणेश कुंभार, पोलीस अंमलदार सपोफौ कोळी, पोह सोनवणे, पोशि किणगी, चापोह गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments