google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...प्राचार्य महेश होनराव यांच्या खुनाच्या तपासासाठी सीबीआय पथक सांगोल्यात सीबीआय होनराव यांच्या हत्येचे गूढ उलघडून? १४ वर्षाचा वनवास संपवणार का?

Breaking News

खळबळजनक...प्राचार्य महेश होनराव यांच्या खुनाच्या तपासासाठी सीबीआय पथक सांगोल्यात सीबीआय होनराव यांच्या हत्येचे गूढ उलघडून? १४ वर्षाचा वनवास संपवणार का?

खळबळजनक...प्राचार्य महेश होनराव यांच्या खुनाच्या तपासासाठी सीबीआय पथक


सांगोल्यात सीबीआय होनराव यांच्या हत्येचे गूढ उलघडून? १४ वर्षाचा वनवास संपवणार का?

सांगोला : शोभनतारा झपके अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य महेश होनराव यांचा १४ वर्षा पूर्वी झालेल्या खुनाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक गेल्या तीन दिवसापासून सांगोला शहरात दाखल झाले

 असून यां पथका कडून सुरवातीपासून तपास केला जात असल्याचे समजते त्यामुळे होनराव यांच्या खुनाचा उलगडा होतो की नाही हे काही दिवसात समजणार आहे.

सांगोला येथील शोभनतारा झपके अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य महेश होनराव हत्या प्रकरणाचा तपास गेल्या काही दिवसापासून सीबीआय कडून युद्ध पातळीवर सुरू असून सांगोला येथील कोर्टात गेल्या वर्षी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावत, 

सदर प्रकरणातील मुळ फिर्यादी यांचे म्हणणे ग्राह्य धरून, प्राचार्य महेश होनराव हत्या प्रकरणाचा, पुढील तपास नव्याने सुरू करून ठोस कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे.

प्राचार्य महेश होनराव यांचा १ मार्च २०१० रोजी अज्ञात व्यक्तीने खून केला होता सुरुवातीला याचा तपास सांगोल्याचे तत्कालीन पो. नि. नितीन होनराव हत्या प्रकरणाचा समाधानकारक तपास करीत

 नसल्याची तक्रार महेश होनराव यांच्या पत्नी रूपाली होनराव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती.

 त्यानुसार मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संजय स्वामी यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती स्वामी यांनी सदर प्रकरणाचा सहा महिने तपास केला परंतु खून कोणी केला याचा तपास लागू शकला नाही

 यावर मृत महेश होनराव याच्या पत्नी रूपाली यांनी तपास योग्य दिशेने होत नाही म्हणून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, 

अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने २१ जानेवारी २०११ रोजी हा तपास सीआयडीच्या साहाय्यक अधीक्षकांकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

सीआयडीचे साहाय्यक अधीक्षक सदर हत्या प्रकरणाचा तपास करीत नसल्याचे कारणावरून रुपाली होनराव यांनी पुन्हा उच्च न्यायालयात 

धाव घेत हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली. त्यावर सुनावणी होऊन सीआयडीला हवा तेवढा वेळ देण्यात आला होता. 

परंतु सीआयडी सदर घटनेच्या तपासात दिरंगाई करत असल्याने सीआयडी कडून सदर प्रकरणाचा तपास काढून घेवून तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.

सीबीआयनेही महेश होनराव हत्या प्रकरणाचा तपास केला परंतु सीबीआयलाही या प्रकरणाचा तपास करण्यात यश झाले नाही. त्यामुळे सीबीआयने सांगोला येथील मे. कोर्टात सदर

 हत्या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या क्लोजर रिपोर्टवर मे. कोर्टाने सदर प्रकरणातील मुळ फिर्यादी यांना म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. मुळ फिर्यादी

क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार द्यावा अशी विनंती मे. कोर्टास केली होती. सदर प्रकरणातील मुळ फिर्यादी यांचे म्हणणे ग्राह्य धरून, प्राचार्य महेश होनराव हत्या प्रकरणाचा, पुढील तपास नव्याने

 करण्याचे आदेश मा. ज्यु. मॅजि.वर्ग-१ सांगोला यांनी सीबीआय मुंबई यांना दिले होते त्यानुसार गेल्या तीन दिवसापासून सीबीआयचे एक अधिकारी व चार कर्मचारी

 सांगोला येथे होनराव प्रकरणाचा तपास करीत असल्याचे समजते त्यामुळे तब्बल १४ वर्षानंतर तरी प्राचार्य महेश होनराव यांच्या मारेकऱ्यांचा तपास आता तरी लागणार का ? याची चर्चा मात्र होताना दिसत आहे.

देशातील सर्वोच्च तपास यंत्रणे कडे या खून प्रकरणाचा तपास असताना देखील अद्याप पर्यंत खून नेमका कोण केला? हे समोर न आल्याने चौदा वर्षां नंतर श्रीरामाचा सुध्दा वनवास संपला होता, 

परंतू प्राचार्य महेश होनराव यांच्या मारेकऱ्यांचा शोध न लागल्याने सीबीआय त्यांच्या खुनाचा तपास लावून वनवास संपवणार का? अशी चर्चा सांगोला शहर व तालुक्यात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments