कृष्णा खोऱ्यातील पुराच्या पाण्याकडे भीमा खोऱ्याचे लक्ष,
पाणी वळवण्याची आमदार शहाजीबापूंची मागणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : कृष्णा खोऱ्यात एकीकडे महापुराचे संकट ओढवले असताना दुसरीकडे दुष्काळी माण प्रदेशातील
सांगोला व मंगळवेढ्यासह जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, माण, खटाव भागातील जनता दुष्काळाचे अरिष्ठ ओढू नये म्हणून प्रार्थना करीत आहे.
त्याचा विचार करून महापुराचे वाया जाणारे पाणी दुष्काळी माण प्रदेशात वळवावे, अशी मागणी सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे २००३-०४ साली उपमुख्यमंत्री असताना कृष्णा खोऱ्यातील दरवर्षी येणाऱ्या महापुराचे पाणी भीमा खोऱ्यात वळवून
सोलापूर, सांगली, सातारा, पुणे तसेच शेजारच्या मराठवाड्यातील धाराशिव, बीड आदी
सहा जिल्ह्यांतील ३६ तालुक्यांना देण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही महत्त्वाकांक्षी योजना मंजूर करून घेतली होती.
नंतर राजकीय शह-काटशहाच्या राजकारणात ही योजना बासनात गुंडाळून ठेवण्यात आली होती. तथापि, अलीकडे जागतिक बँकेने या योजनेसाठी अर्थसाह्य मंजूर केले आहे.
या पार्श्वभूमीवर यंदा कृष्णा खोऱ्यात कोल्हापूर व सांगलीत आलेल्या महापुराच्या संकटाचा विचार करता हे महापुरात वाहून जाणारे १०५ टीएमसी पाणी भीमा
खोऱ्यात वळविण्याची मागणी प्रकर्षाने होत आहे. आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी हाच धागा पकडून शासनाकडे मागणी केली आहे.
0 Comments