google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील१४६ चारा छावणी चालकांचे जवळपास २१ कोटी ४७लाख १४हजार ९२२ रुपयांच्या प्रलंबित बिले मंजूर होणार, अखेर आपले शेकाप चे नेते भाई जयंतरावजी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मार्ग मोकळा…

Breaking News

सांगोला तालुक्यातील१४६ चारा छावणी चालकांचे जवळपास २१ कोटी ४७लाख १४हजार ९२२ रुपयांच्या प्रलंबित बिले मंजूर होणार, अखेर आपले शेकाप चे नेते भाई जयंतरावजी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मार्ग मोकळा…

सांगोला तालुक्यातील१४६ चारा छावणी चालकांचे जवळपास २१ कोटी ४७लाख १४हजार ९२२ रुपयांच्या प्रलंबित बिले मंजूर होणार,


अखेर आपले शेकाप चे नेते भाई जयंतरावजी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मार्ग मोकळा…

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 सांगोला तालुक्यातील प्रलंबित चारा छावणी बिलासंदर्भात तसेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.श्री.अनिल पाटील यांच्यासमवेत वेळोवेळी झालेल्या बैठकीनुसार

 तसेच आज पावसाळी अधिवेशनात सभागृहात ही प्रलंबित बिलासंदर्भात मागणी करून तो प्रश्न अखेर मार्गी लावल्या बद्दल मनस्वी आभार…

सन २०१८-१९ मध्ये सांगोला तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळामुळे चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यावेळच्या १४६ चारा छावणी चालकांचे जवळपास २१ कोटी ४७ लाख

 १४हजार ९२२ रुपये इतकी बीले शासनाकडे आज ही प्रलंबित आहे ते लवकर मिळावे यासाठी चारा छावणी चालकांसमवेत राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन 

मंत्री ना.अनिल पाटील यांची भेट घेऊन भाई जयंत जी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात आपण सदर छावणी चालकांचे बिल लवकरात लवकर अदा करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दिले होते .

गेल्या तीन ते चार वर्षांपासून चारा छावणी बिले शासन दरबारी प्रलंबित असल्याने या छावणी चालकांची खूप मोठी अर्थिक कुचंबना होत आहे. 

छावणी चालकांच्या या मागणीवर यापूर्वीही वेळोवेळी भाई जयंत जी पाटील साहेब यांनी सभागृहाच्या माध्यमातून अधिवेशनात तसेच पाठपुरावा व निवेदनाच्या माध्यमातून त्यांची रखडलेली बिले

 मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. तत्कालीन दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये तालुक्यातील पशुधन व पशुपालक यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या छावणी चालकांनी

 खूप मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यामुळे त्यांना बिले मिळण्यात असणाऱ्या त्रुटी लवकरात लवकर दूर करून अदा करण्यात यावीत असे मंत्री महोदय यांच्याकडे मागणी केली.

Post a Comment

0 Comments