दमदार कामगिरी.. सांगोला पोलिसांची दोन ठिकाणी वाळू उपशावर कारवाई
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडून नऊ लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शनिवारी (दि.२९ जून) रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पुजारी वस्ती ते कोपटे वस्ती
सांगोला या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा छोटा हत्ती (क्र. एम एच ४५ टी २८५५) किंमत चार लाख रुपये व यामध्ये भरलेली एक ब्रास वाळू किंमत चारहजार रुपये असा
चार लाख चार हजार रुपयांचा वाहनासह वाळू असा मुद्देमाल पकडला आहे.
वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याची फिर्याद पोलिस गणेश कुलकर्णी यांनी दिली आहे.
तर दुसऱ्या घटनेमध्ये वेलवन नदी नाझरा येथे लाल रंगाचानंबर नसलेला ट्रॅक्टर सोबत अवैध वाळूने भरलेली ट्रॉली पकडली आहे.
याची किंमत पाच लाख रुपये आहे. अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याची फिर्याद पोलिस रमेश कांबळे यांनी दिली आहे. सांगोला तालुक्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर
सांगोला पोलिसांनी कारवाई करण्याचा धडाका लावल्याने अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.


0 Comments