google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सोलापूर- बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन एक ठार

Breaking News

खळबळजनक..सोलापूर- बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन एक ठार

खळबळजनक..सोलापूर- बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन एक ठार 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मंगळवेढा : बेकायदा वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलीसांना पाहताच चालकाने वेगाने पळाल्याने त्यामध्ये वाहन पलटी होवून एकाचा मृत्यू तर अन्य एक जखमी झाल्याची घटना घडली

 असून या प्रकरणी वाहन चालक सुरज शहाजी चव्हाण (रा.सांगोला),गणेश दत्तत्राय मस्के,गणेश भाऊसाहेब मस्के,देवल शक्तीमान उघडे (रा.शिरगाव

 ता.पंढरपूर),वाहन मालक चैतन्य सुभाष गायकवाड (रा.ओझेवाडी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी पोलीस नाईक ईश्वर दुधाळ व पोलीस हवालदार श्रीमंत पवार,

पोलीस अंमलदार कदम हे दि.22 रोजी 4 वाजता पेट्रोलिंग करीत उचेठाण परिसरात आले असता त्यांना मुढवी येथून एक अवैध वाळू वाहतुक करणारे वाहन आले होते. यावेळी कारखाना चौकात पोलीस थांबले असता

 त्यांना पाहून पांढर्‍या रंगाचे चार चाकी एन्ट्रा वाहन येत असल्याचे पोलीसांना वाळू वाहतूकीचा संशय आल्याने वाहन थांबविण्याचा इशारा केला,मात्र ते वाहन पुढे तसेच उचेठाण गावच्या दिशेने जात असताना

 गडदे वस्ती येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ते पलटी झाले. पोलीसांनी सदर घटने ठिकाणी पाहणी केल्यावर तीन इसम जखमी अवस्थेत रोडवर पडले होते 

त्यांचे डोकीस,पायास,हातास जखमा झाल्या होत्या. सदर इसमांची चौकशी केली असता वाहन चालक सुरज चव्हाण व हौद्यात पाठीमागे बसलेले

 गणेश दत्तात्रय मस्के,गणेश भाऊसाहेब मस्के,देवल शक्तीमान उघडे,वाहन मालक चैतन्य सुभाष गायकवाड असे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीसांनी 2 लाखाचा एन्ट्रा चार चाकी वाहन,

2 हजार किंमतीची अर्धा ब्रास वाळू असा एकूण 2 लाख 2 हजार रुपयाचा मुद्देमाल केला आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान भीमा व माण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक चालते.

Post a Comment

0 Comments