google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या लग्नाला 57 वर्षे, पतीने पत्नीचे केले 57 तुकडे; कारणही धक्कादायक

Breaking News

एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या लग्नाला 57 वर्षे, पतीने पत्नीचे केले 57 तुकडे; कारणही धक्कादायक

एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या लग्नाला 57 वर्षे, पतीने पत्नीचे केले 57 तुकडे; कारणही धक्कादायक


एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. त्यांच्या लग्नाला 57 वर्षे झाली. 

इतक्या वर्षांनंतर पत्नीने पतीला असं काही सांगितलं की त्याने तिचे 57 तुकडे केले.बिहारच्या अरवाल जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे.

जमुहरी गावातील हे प्रकरण. 76 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसादची पत्नी सुमती सिन्हाची हत्या केली आहे. 

आरोपी बिरबलने कुटुंबातील इतर सदस्यांना खोलीत बंद करून हे कृत्य केल्याचं सांगितलं. 

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुलगा खासगी शाळेतून घरी आला असता घरात रक्त पाहून आरडाओरडा करू लागला. 

यादरम्यान बिरबलने सून आणि नातवासह गावकऱ्यांना हातात धारदार शस्त्र घेऊन धमकावण्यास सुरुवात केली.

लग्नाला 57 वर्षे, पत्नीचे केले 57 तुकडे 

या घटनेची माहिती मिळताच मेहंदिया पोलिसांनी घटनास्थळ गाठून मारेकऱ्याला अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून धारदार शस्त्र जप्त केलं आहे.

 या संदर्भात एसपी राजेंद्र कुमार भील यांनी सांगितलं की, सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद याला अटक करण्यात आली

 असून त्याने पत्नीचे 57 तुकडे केल्याचा दावा केला आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी बिरबल प्रसादने सांगितलं, लग्नाला 57 वर्षे झाली होती, त्यामुळे त्याने पत्नीचे एकूण 57 तुकडे केले. पोलिसांनी सांगितलं

 की, मृतदेहाचे सुमारे 12 तुकडे करून विच्छेदन करण्यात आलं होतं. या घटनेची संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे.

लग्नाच्या 57 वर्षांनंतर पत्नीने ते सत्य सांगितल्याने हत्या

बिरबलची पत्नी सुमतीने आपल्या काकांशी अवैध संबंध होते असं सांगितलं. त्यानंतर बिरबल संतापला. तिचे काका 8 वर्षांपूर्वी वारले. 

तरी या अवैध संबंधाची माहिती मिळताच बिरबलने रागाच्या भरात सुमतीची धारदार शस्त्राने हत्या केली.

लव्ह मॅरेजनंतर 6 महिन्यातच केले तुकडे

जून 2024 मध्ये समोर आलेली उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमधील ही धक्कादायक घटना. अरबाज नावाचा तरुण. 

सहा महिन्यांपूर्वीच उत्तराखंडमधील 21 वर्षीय चाहत नावाच्या तरुणीसोबत त्याने प्रेमविवाह केला होता. 

घरच्यांना काहीही न सांगता तो भाड्याच्या खोलीत राहू लागला. या काळात त्याने अनेक वेळा खोल्या बदलल्या.

 पण त्यानंतर अरबाजने चाहतची धारदार शस्त्राने हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचा निर्घृणपणे शिरच्छेद केल्यानंतर आरोपीने तिचे हातही कापले होते. मृतदेहाचे अनेक तुकडे केले.

असा झाला हत्येचा उलगडा 

पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापती यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, अरबाजने त्याचा मित्र शाहरुखच्या मदतीने

 बाईकवरून काली नदीत मृतदेह फेकून दिला होता. मात्र नदीत मोठ्या प्रमाणात जलकुंभ वाढला होता.

अनेक दिवस मृतदेह नदीतील जलकुंभात अडकून राहिला आणि पुढे सरकत नव्हता. आठवडाभरानंतर आरोपी पती त्याच्या मित्रासोबत हा मृतदेह तिथून काढण्यासाठी पोहोचला. 

तेव्हाच पोलीसही तिथे पोहोचले आणि त्याला जागीच पकडलं. मात्र, त्याचा मित्र शाहरुख तिथून पळून गेला. 

चौकशीत आरोपी पतीने पोलिसांसमोर खुनाची कबुलीही दिली. तरुणाच्या माहितीवरून पोलिसांनी हत्या ज्या शस्त्राने केली होती, ते जप्त केलं.

पत्नीच्या दैनंदिन खर्चाला वैतागला 

हत्येमागचे कारण समजू शकलं नाही, मात्र चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितलं की, चाहत अतिशय उद्धट होती.

 तिच्या दैनंदिन खर्चावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं झाली होती. यानंतर अरबाजने मित्राच्या मदतीने तिची हत्या केली.

Post a Comment

0 Comments