google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा प्रमुखपदी प्रितेश दिघे यांची निवड

Breaking News

शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा प्रमुखपदी प्रितेश दिघे यांची निवड

शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा प्रमुखपदी प्रितेश दिघे यांची निवड 


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): शिवसेना प्रणित विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी आमदार शहाजीबापू पाटील यांचे खंदे समर्थक सांगोला तालुक्यातील वाढेगावचे प्रितेश दिघे यांची निवड करण्यात आली.

 युवासेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील यांच्या हस्ते प्रितेश दिघे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

ही निवड शिवसेना विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व कार्यकारणी सदस्य सुजित खुर्द यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली.

        सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे खंदे समर्थक, शिवसेनेचे वाढेगावचे तरुण तडफदार कार्यकर्ते प्रितेश दिघे यांच्या खांद्यावर

 शिवसेना प्रणित विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. युवासेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील यांच्या हस्ते प्रितेश दिघे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, युवासेनेचे तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे, माजी सरपंच अशोक दिघे यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

     यावेळी बोलताना शिवसेना प्रणित विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रितेश दिघे म्हणाले की, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

 शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी बसेस, शिष्यवृत्ती, शैक्षणिक सवलती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. 

तसेच आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावागावात विद्यार्थी संघटनेची स्थापना करून संघटना मजबूत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणार असल्याचा विश्वास प्रितेश दिघे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments