सांगोला तालुक्यात ११ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या बाजरी, तूर, मका, सूर्यफूल या प्रमुख नगदी पिकांचा वाढला पेरा
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२): गेल्या खरिपाच्या तुलनेत यंदा आतापर्यंतच्या झालेल्या पेरण्या दमदार असून
बाजरी, तूर, मका, सूर्यफूल या प्रमुख नगदी पिकांचा पेरा वाढला आहे.
सांगोला तालुक्यात २१ जून अखेर ११ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर (५०.६८ टक्के) पेरण्या झाल्या असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.
यंदा सांगोला तालुक्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीचा वेग सुसाट आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केल्याने खरीप हंगामातील पेरण्या सुसाट आहेत.
मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात पेरणीयोग्य व समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाची पेरणी अत्यंत कमी क्षेत्रावर झाली होती.
परंतु यावर्षी जिल्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पर्यायाने जिल्ह्यात यंदा खरीप पेरणी क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
सांगोला तालुक्यात २१ जून अखेर खरीप हंगामात मका ६ हजार ७०० हेक्टर ,१७१.७४ हेक्टर सूर्यफूल, ४३६.९० हेक्टर
(१५३.९५ टक्के), तूर ४४५.५० हेक्टर (१७.३२), मूग २७ हेक्टर (३१.५४), उडीद १५४ हेक्टर (१६३.८३), बाजरी ३ हजार ६७२ हेक्टर (२३.५४ टक्के),
मटकी ५२ हेक्टर अशा ८०० हेक्टर, भुईमूग १५ हेक्टर (९.६९ टक्के), सोयाबीन १ हेक्टर, कापूस ९ हेक्टर अशा ११ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर (५०.६८ टक्के) पेरण्या झाल्या आहेत.
कृषी विभागाने यंदा घेतलेल्या बीजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणी, घरच्या बियाण्यांचा वापर, जनजागृती, शेतीशाळा या मोहिमांचा चांगला उपयोग झालेला आहे.
घरच्या बियाण्यांच्या वापराबाबतच्या मोहिमांमुळे बियाणे खरेदीवर यंदा ताण आला नाही. मात्र, अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्यासारखे चित्र दिसत आहे.
यामुळे पेरणी झालेल्या भागात पाऊस लांबल्यास त्याचा उगवलेल्या पिकांवर परिणाम होतो की अशी धाकधूक शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे.
0 Comments