google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. लोकसभेत यश ; पण शरद पवार सावध

Breaking News

मोठी बातमी.. लोकसभेत यश ; पण शरद पवार सावध

मोठी बातमी.. लोकसभेत यश ; पण शरद पवार सावध


पिपाणी चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अगदी सावध पवित्रा घेतला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत पिपाणीचा धोका टाळण्यासाठी पवार गटाने निवडणूक आयोगात धाव घेतली

 असून पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावे, अशी पवार गटाची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीत तुतारी घेऊन मैदानात

 उतरलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणीमुळे मोठा फटका बसला. तुतारी अन् पिपाणी चिन्ह सारखे असल्यामुळे शरद पवार यांच्या उमेदवारांना खूप मोठा फटका बसला.

 तसेच राष्ट्रवादीची सातारा लोकसभेची जागाही चिन्हाच्या घोळामुळे गमवावी लागली, यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने पिपाणीविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.

 पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावे, अशा मागणीचे पत्र निवडणूक आयोगाला लिहले आहे.

 पिपाणी चिन्हांमुळे लोकसभेत फटका बसल्यानंतर पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे ही विनंती करण्यात आली असून निवडणूक आयोगाने योग्य निर्णय न घेतल्यास पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

Post a Comment

0 Comments