google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील धक्कादायक घटना ... पत्नीचा विरह सहन न झाल्याने विषारी औषध प्राशन करून कृषी पर्यवेक्षकाची आत्महत्या

Breaking News

सांगोला तालुक्यातील धक्कादायक घटना ... पत्नीचा विरह सहन न झाल्याने विषारी औषध प्राशन करून कृषी पर्यवेक्षकाची आत्महत्या

सांगोला तालुक्यातील धक्कादायक घटना ... पत्नीचा विरह सहन न झाल्याने विषारी औषध प्राशन करून कृषी पर्यवेक्षकाची आत्महत्या 


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

बलवडी, ता. सांगोला) असे मृताचे नाव असून ही घटना १० मे रोजी दुपारी १२:४५ च्या सुमारास वझरे (ता. सांगोला) येथील शेतातील पत्रा शेडमध्ये उघडकीस आली.

 याबाबत, मयताचा भाऊ जितेंद्र अशोक भाले यांनी पोलिसात खबर दिली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील दोन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारविकास भाले हे उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर अंतर्गत महूद येथील सीड फॉर्म येथे कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत होते.

 त्यांच्या आजारी पत्नीचे एक महिन्यांपूर्वी निधन झाल्यानंतर ते मानसिक तणावाखाली होते.

 त्यातूनच विकास भाले यांनी १० मे रोजी त्यांच्या वझरे येथील शेतातील पत्रा शेडमध्ये जाऊन विषारी औषध प्राशन केले. 

दरम्यान भाऊ विकासघरात कोठे दिसून येत नाही म्हणून नातेवाइकांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क केला असता फोन वाजत होता, परंतु ते उचलत नव्हते.

 म्हणून नातेवाइकांनी शोध घेतला असता ते वझरे शेतातील पत्रा शेडमध्ये बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. उपचारासाठी त्यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Post a Comment

0 Comments