google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..हक्काचे पाणी मिळवण्यासाठी हजारोंच्या संख्येने फलटण येथे उपस्थित राहावे : डॉ भाई बाबासाहेब देशमख

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..हक्काचे पाणी मिळवण्यासाठी हजारोंच्या संख्येने फलटण येथे उपस्थित राहावे : डॉ भाई बाबासाहेब देशमख

ब्रेकिंग न्यूज..हक्काचे पाणी मिळवण्यासाठी हजारोंच्या संख्येने फलटण येथे उपस्थित राहावे : डॉ भाई बाबासाहेब देशमख


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/प्रतिनिधी निरा उजवा कालव्यालाचे हक्काचे पाणी मिळवण्यासाठी कार्यकारी अभियंता, 

नीरा उजवा कालवा विभाग फलटण कार्याल येथे सर्व शेतकऱ्यांनी सोमवार दिनांक १३/५/२०२४ रोजी हजारोंच्या संख्येने उपस्थित 

राहुन हक्काचे पाणी मिळवण्यासाठी सोलापूर जिल्हाचे नेते मा. विजय (दादा) मोहिते पाटील, आमदार रणजीतसींह मोहिते पाटील, मा. संभाजीराजे शिंदे, यांच्या उपस्थितीत

 फलटण कार्यालयावर जाऊन प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सांगोला माळशिरस पंढरपूर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे

निरा उजवा कालव्याला जे पाणी आले ते पाणी १५ दिवसा आगोदरच बंद करण्यात आले आहे जे पाणी आले ते सुध्दा कमी दाबाने सोडल्यामुळे

 शेतकऱ्यांचे भरणे पुर्ण झाले नाही. आज सांगोला विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वण-वण करावी लागत आहे.

 सध्या जनावरांना सुध्दा पिण्यासाठी पाणी नाही. एवढी पाण्याची तारांबळ निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात जर पाऊस वेळेवर पडला नाही तर आणखीन बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे.

 राज्य सरकारने सांगोला तालुका या पुर्वी दुष्काळी म्हणून घोषित केलेला आहे तरीही पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांना पिण्यासाठी पाण्याची आजिबात उपाययोजना केलेली नाही.. 

दुष्काळाच्या परिस्थीती मध्ये ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे ते न करता चालु पाणी सुध्दा यांनी बंद केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

एकतर शेती व्यवसाय पुर्णतः अडचणीत असताना शेतकरी आपली उपजिवीका करण्यासाठी दुध व्यवसायाकडे वळालेला आहे.. आशा परिस्थीत दुधाला दर नाही..व जनावरांना चारा तर नाहीच 

पिण्यासाठी सुध्दा पाणी नाही आशा बिकट अवस्थेत शेतकरी सापडला आहे. प्रशासनाने या गोष्टी कडे कानाडोळा केलेला आहे.. राजकीय दबावापोटी पाणी सोडणे 

बंद करणे हे प्रकार राजकीय दबावाखाली घेते की काय आशी शंका निर्माण झाली आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाण्याचे राजकारण न करता.... शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून

 शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी पक्ष भेद विसरून पाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे काही नेत्यांकडुन पाण्याचे राजकारण होताना दिसत आहे.. ते होता कामा नये.

नियमानुसार निरा उजवा कालवा हा २० मे अखेर चाललने अपेक्षीत असताना ९ ते १० तारखेलाच पाणी बंद करण्याचे आदेश आलेले आहेत व पाणी बंद करण्यात 

आल्यामुळे अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद अवस्थेत येणार आहेत .. त्यामुळे येणाऱ्या काळात पुर्ण क्षमतेने पाणी यावे व ते पाणी वेळेवर यावे

 यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने फलटण येथील कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा फलटण कार्यालयावरती हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे 

आवाहन पुरोगामी युक्क संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments