खळबळजनक घटना...दारू पिणार नाही, म्हणून शपथ घेऊनही पती पुन्हा दारू प्यायल्याने
पत्नीने केली आत्महत्या सांगोला तालुक्यातील घटना..
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : दारू पिणार नाही, म्हणून शपथ घेऊनही पती पुन्हा दारू प्यायल्याने पत्नीने किरकोळ वादातून घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना शनिवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास सांगोला तालुक्यात सावे येथे घडली. सुश्मिता अजित पांढरे (२० रा.सावे ता.सांगोला) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत सांगोलाग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसात खबर दिली असून अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
सावे येथील अजित पांढरे याचा दीड वर्षापूर्वी सुष्मितासोबत विवाह झाला होता. पांढरे दाम्पत्यांना सहा महिन्यांची मुलगी आहे.
दरम्यान, पती अजित हे मद्यपान करीत असल्याने सुश्मिताला ते आवडत नव्हते. त्यामुळे दोघांत वाद व्हायचा. अखेर अजितने दारू पिणार नाही, म्हणून पत्नीसमोरशपथ घेतली होती.
मात्र, शुक्रवारी पुन्हा दारू प्यायल्याने पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून सुश्मिताने राहत्या घरी पहाटे गळफास घेतला. यावेळी त्यांची लहान मुलगी रडू लागली
आणि सारे जागे झाले. नातेवाईक मारुती पांढरे यांनी सुश्मितास सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
0 Comments