धक्कादायक ..पतीची गळा आवळून हत्या; पत्नीला अटक
वर्धा:- घरगुती कलहातून झालेल्या वादात पतीची गळा आवळून हत्या करण्यात आली.
ही घटना मंगळवारी ७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास परिसरात नागठाणा येथे घडली. चौकशीदरम्यान या घटनेचे बिंग फुटले आणि शवविच्छेदन
अहवालावरून ८ मे रोजी हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपी पत्नीस अटक केली. गणेश हरिभाऊ भलावी (वय ४०) रा. नागठाणा असे मृतकाचे नाव आहे.
नागठाणा येथील रोजमजुरी करणारे गणेश भलावी सकाळी मजुरी कामासाठी निघाले. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर गणेशचा पत्नी सुनीताशी घरगुती कारणातून वाद झाला.
वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. संतापलेल्या पत्नीने रागाच्या भरात पती गणेशची गळा आवळून त्याची हत्या केली.
0 Comments