दुर्दैवी घटना.. सांगोला- जत मार्गावर सोनंद गावाजवळ जीपचा टायर फुटून भीषण अपघात; तीन महिला ठार, नऊ गंभीर जखमी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला- जत मार्गावर सोनंद गावाजवळ एका जीपचा टायर फुटुन झालेल्या अपघातात तीन महिला मजूरांचा मृत्यू झाला.
या महिला कर्नाटकातील अथणी येथील असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
या अपघातामधील अन्य जखमी महिलांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : कर्नाटकातील अथणी येथील मजूर महिला पंढरपूर तालुक्यात द्राक्ष बागेतील
कामांसाठी जीप मधून निघाल्या हाेत्या. या जीपचा सोनंद गावाजवळ टायर फुटल्याने अपघात झाला.
आज सकाळी बेळगांव जिल्ह्यातील अथणी येथील चौदा महिला या पंढरपूर तालुक्यातील पाचेगाव येथील द्राक्ष बागेत काम करण्यासाठी जात होत्या.
दरम्यान, जत ते सांगोला रोडवर जीपच्या डाव्या बाजूचे पाठीमागील चाक फुटल्याने जीप पलटी झाली.
पलटी झाल्याने जीपमधील महिला या बाहेर फेकल्या गेल्या. त्यामुळे तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या असून दोघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरजला हलविले आहे.
मृत व जखमी महिला या बेळगांव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बळोग्री व ममलाद या दोन गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अपघाताची माहिती मिळताच सांगोला तालुका पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत जखमींना उपचारासाठी हलविण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने मोठी मदत केली.
या अपघातात तीन महिलांचा जागेवर मृत्यू झाला तर नऊ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
जखमी महिलांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची नोंद सांगोला पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सांगाेला पाेलिस करीत आहेत.
0 Comments