खळबळजनक! कोर्टातील केस मागे घेतली नाही म्हणून पुतण्याचा निर्घृण खून; काका व चुलत भावावर गुन्हा सोलापूर जिल्ह्यातील घटना...
कोर्टात चालू असलेली केस मागे न घेतल्याचा राग मनात धरून सलगर (ता. अक्कलकोट) येथील एका तरुणाचा दगड व लोखंडी पाइपने मारून निघृण खून करण्यात आला.
भीमाशंकर श्रीकांत पोलासे (वय २७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून सोमवार, ६ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात उमेश मलप्पा पोलासे, सुरेश मलप्पा पोलासे, मलप्पा गणपती पोलासे (सर्व रा. सलगर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी मयत भीमाशंकरचे वर्षाभरापूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी गरोदर आहे. तो घरातून शेताकडे म्हशीची धार काढण्यासाठी भाऊ धोंडप्पाला सोबत घेऊन निघाला होता.
शेतात गेल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी कामात गुंतले. याची संधी साधत आरोपींनी त्याच्यावर खुनी हल्ला चढवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.
कोर्टातून केस काढून न घेतल्याचा राग मनात धरून फिर्यादीचा मुलगा भीमाशंकर यास दगडाने आणि लोखंडी पाइपाने मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले.
याबाबत मयताचे वडील श्रीकांत गणपती पोलासे (वय ५८) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बागाव हे करीत आहेत.
वर्षभरापूर्वी झाले होते लग्न..
सलगर शिवारात श्रीमंत पाटील यांच्या शेताजवळून जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर आरोपी संगनमत करून आले. आमच्याविरुद्ध तुम्ही केलेली केस काढून घ्या,
आम्हाला त्रास होत आहे, केस काढून नाही घेतली तर तुला अन्यथा तुझ्या मुलाला जिवे मारतो, असा दम त्याच्या वडिलास आरोपींनी दिला होता.
0 Comments