google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...सांगोल्यात देशमुख, पाटलांचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांना केले रक्तबंबाळ यामध्ये दोन्ही गटाचे पाच ते सहा जण गंभीर जखमी

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...सांगोल्यात देशमुख, पाटलांचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांना केले रक्तबंबाळ यामध्ये दोन्ही गटाचे पाच ते सहा जण गंभीर जखमी

ब्रेकिंग न्यूज...सांगोल्यात देशमुख, पाटलांचे कार्यकर्ते भिडले;


एकमेकांना केले रक्तबंबाळ यामध्ये दोन्ही गटाचे पाच ते सहा जण गंभीर जखमी 

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- पश्चिम महाराष्ट्रातील सहा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान सुरू आहे. या मतदाना दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सांगोला तालुक्यातील महूद गावातील मतदान केंद्रावर जोरदार राडा झाला.

या मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणारे रणजितसिंह निंबाळकर यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांत हा राडा झाला.

सांगोला तालुक्यातील महूद येथे शेतकरी कामगार पक्ष  आणि शिवसेनेच्या  कार्यकर्त्यांमध्ये जोरात हाणामारी झाली. 

या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षातील देशमुख गटाचे कार्यकर्ते व शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यात वाद झाला. 

त्यानंतर झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील पाच ते सहा कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सांगोला तालुक्यातील महूद येथे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटाचे पाच ते सहा जण गंभीर जखमी झाली आहेत. 

मतदारांना मतदान केंद्रापर्यंत सोडण्याच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे शंकर पाटील यांच्यासह चार ते पाच तर तर शिवसेनेचे तीन ते चार कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.

 दोन्ही गटांनी दगड आणि काट्याने एकमेकांवर हल्ला केला. यामध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले आहेत.

सांगोला तालुक्यामध्ये शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यात दोन्ही पक्षांमध्ये आता टोकाचा संघर्ष उभा राहिला आहे. 

या घटनेनंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.

Post a Comment

0 Comments