google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...पंढरपूर मंदिरात सापडले अशा आकाराचे तळघर, मंदिर समिती पुरातत्व विभागाकडून होणार पाहणी.

Breaking News

खळबळजनक...पंढरपूर मंदिरात सापडले अशा आकाराचे तळघर, मंदिर समिती पुरातत्व विभागाकडून होणार पाहणी.

खळबळजनक...पंढरपूर मंदिरात सापडले अशा आकाराचे तळघर,



मंदिर समिती पुरातत्व विभागाकडून होणार पाहणी.




पंढरपूर दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील 

संवर्धनाचे व सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विठ्ठल- रुक्मिणीच्या गर्भगृहातील काम पुर्ण झाले आहे.

 त्यामुळे येत्या 2 जून पासून भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आस लावून बसले आहेत.

दरम्यान विठ्ठल मंदिरातील सोळखांबी जवळील हनुमान दरवाजा येथे फरशी व दगडाचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरु असतानाच एक दगड खचला.

 तो दगड काढून पाहिला असता तर त्या ठिकाणी 6 फुट खोल तळघर असल्याचे दिसून आले. 

या तळघरात मुर्ती सदृष्यवास्तू असल्याचे दिसून आले आहे. या तळघरात नेमके काय आहे, हे तळघर केव्हाचे आहे, तळघर आहे की येथून भुयारी मार्ग आहे.

 याबाबत अधिक माहिती मंदिर समिती पुरातत्व विभाग, महाराज मंडळी, जानकारांकडून घेतली जात असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

 तळघरात मुर्तीसदृष्य वस्तू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला पुरातन रुप देण्यासाठी तीन टप्प्यात काम करण्यात येत आहे. 

यातील पहिल्या टप्प्यातील कामाला 15 मार्च पासून सुरुवात झालेली आहे.याकरीता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शनही बंद करण्यात आलेले आहे.

 तर सकाळी 6 ते 11 या वेळेतच केवळ मुख दर्शन सुरु ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील संवर्धन व सुशोभिकरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. 

तर गुरुवारी सायंकाळी 7 वाजता मंदिरातील हनुमान दरवाजा येथील दगडी फरशीचे व भिंतीच्या दगडांचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरु होते. दगडी फरशीचे फ्लोरिंग करीतअसताना एक दगड खाली दबला गेला. तेथे पोकळी निर्माण झाली. 

तेव्हा तो दगड बाजुला काढून घेण्यात आला. तेव्हात्या दगडाच्या खाली पोकळी दिसून आली.फ्लोरिंग करणाऱ्यां कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या प्रकाशझोतात पाहिले असता येथे तळघर असल्याचे दिसून आले आहे. 

या तळघरात मुर्तीसदृष्य वस्तू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. मात्र, एकच दगड काढून पाहणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे तळघर आहे की भुयार आहे.

 याबाबत नेमके सांगता येत नाही. तसेच या सहा बाय सहा च्या तळघरात कशाची मुर्ती आहे. हे समजू शकलेले नाही.

Post a Comment

0 Comments