महूद रेल्वे गेट(31ब) येथील काम दर्जेदार करण्यात यावे:-अशोक कामटे संघटना रेल्वे गेटवरील गतिरोधकाची उंची कमी करावी :-अशोक कामटे संघटना
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) मिरज रेल्वे रोड बोगदा , महूद रेल्वे गेट येथील दुरुस्तीची कामे दर्जेदार करावीत अशी मागणी
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने पंढरपूर येथील मध्य रेल्वे विभागाचे अभियंता यांच्याकडे केली आहे.
सुरुवातीस महूद रोड येथील काँक्रीटीकरण काम ते भविष्यकाळात टिकाऊ होण्याकरता दर्जेदार होणे गरजेचे आहे
तसेच येथील तयार केलेली गतिरोधकमुळे वाहनांचे अपघात सातत्याने या ठिकाणी घडत आहे, येथील गतिरोधकाची योग्य उंची ठेवून त्याची पुन्हादुरुस्ती करण्यात यावी
तसेच मिरज रोड येथील भुयारी मार्गात अनेक खड्डे पडले आहेत , मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाळ्यात पाण्याची तळी बनली होती ,
येणाऱ्या पावसाळ्यात वाहनधारकांना व पादचाऱ्यांना त्रास होऊ नये याकरता त्याचा निचरा योग्य होण्याकरिता रेल्वे प्रशासनाने व्यवस्था तात्काळ करावी
अशी मागणी कामटे संघटनेने रेल्वेचे अभियंता अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे त्यांनी लवकरच या सर्व समस्यांचा निपटारा करू असे आश्वासन शहीद अशोक कामटे संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले आहे.
0 Comments