सांगोला पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी सिद्धेश्वर नागटिळक यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न.
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला /प्रतिनिधी: सांगोला पंचायत समिती येथे कार्यरत असलेले कृषी विस्तार अधिकारी सिद्धेश्वर जनार्धन नागटिळक
हे मंगळवार दि.30 एप्रिल 2024 रोजी सेवानिवृत्त झाले .
सेवानिवृत्ती निमित्त सिद्धेश्वर नागटिळक यांचा सत्कार सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर साहेब, गटविकास अधिकारी आनंद लोकरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच यावेळी सांगोला तालुका ग्रामसेवक संघटने तर्फे सन्मान करण्यात आला.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद सावंत,उप अभियंता ठोंबरे साहेब,
बालविकास प्रकल्प अधिकारी मोलाणे साहेब, कृषी अधिकारी दिपाली शेंडे, विस्तार अधिकारी प्रतिभा पवार, विस्तार अधिकारी वसंत फुले ,अमोल तोडकरी, अभिजीत पवार ,
सर्व विस्तार अधिकारी , स.ले.अ.आनंद जाधव ,कक्ष अधिकारी स्वामी साहेब, महेश जाधव ,नागणे साहेब, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक संघटना पदाधिकारी
शहाजीराव इंगोले, बाळू शिंदे, राजकुमार ताटे, खान साहेब मुलाणी, तसेच सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी,तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सिद्धेश्वर नागटिळक यांनी एकूण 34 वर्ष 4 महिने नोकरी केली. सांगोला पंचायत समिती येथे 13 वर्ष कामकाज पाहिले .
तर माळशिरस पंचायत समिती येथे ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी पदावर 19 वर्ष व कृषी विस्तार
अधिकारी पदावर 2 वर्ष 4 महिने त्यांचा सेवा कार्यकाल आहे. तसेच त्यांना 2018.19 मध्ये जिल्हा परिषदेचा कृषिमित्र पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
सत्कारास उत्तर देताना त्यांनी सांगितले की , सांगोला पंचायत समिती येथे काम करीत असताना जिल्ह्याचे
सर्व पदाधिकारी, अधिकारी ,तसेच सांगोला तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व विभागाचे अधिकारी,
कर्मचारी ,शेतकरी बांधव ,ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या सहकार्यामुळेच या पदावर प्रामाणिकपणे काम करू शकलो.
त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच सत्कारप्रसंगी मान्यवरांनी त्यांचा सत्कार करीत त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
0 Comments