google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.

Breaking News

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.

 वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.


सांगोला ( प्रतिनिधी)( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात महाराष्ट्र दिनाच्या 65 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रशालेत सुरुवातीस महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेचे सचिव नीलकंठ शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालीतील इयत्ता पाचवी ते नववी मधील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचे निकाल पत्रक वाटप करण्यात आले

 या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम,संस्था सचिव नीलकंठ शिंदे सर यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वर्षाकरिता शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी केले. ध्वजारोहणास मानवंदना संतोष कुंभार सर यांनी दिली. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments