google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात कडलास येथे चोरी; चोरट्यांनी पळविला २ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल

Breaking News

सांगोला तालुक्यात कडलास येथे चोरी; चोरट्यांनी पळविला २ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल

सांगोला तालुक्यात कडलास येथे चोरी; चोरट्यांनी पळविला २ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) :- अज्ञात चोरट्यांने घरात शिरुन कपाटामध्ये ठेवलेले २ लाख ५२ हजार रुपये किंमतीचे सोने व १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला असल्याची घटना 

दि. १४/०५/२०२४ रोजी रात्रीचे सुमारास चव्हाण वस्ती, कडलास ता. सांगोला येथे घडली. चोरीची फिर्याद सचिन चव्हाण (रा. कडलास ता. सांगोला) यांनी दिली आहे.

चोरट्यांनी १ लाख ३५ हजार रुपयेकिंमतीचे सोन्याचे ४.५ तोळे वजनाचे गंठण, ४५ हजार रु. किंमतीचे सोन्याची १.५ तोळे वजनाचे बोरमाळ, 

२१ हजार रुपये किंमतीची सोन्याचे ७ ग्रॅम वजनाची बोरमाळ, २१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ७ ग्रॅम वजनाचे 

दोन्ही कानाचे झुबे व फुले, ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची १ तोळा वजनाची पिळ्याची अंगठी व रोख १० हजार रु पळवून नेले आहेत.

याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. १४ मे २०२४ रोजी रात्री १०/०० वा. चे सुमारास फिर्यादी व घरातील सगळे लोक असे जेवणखाण करुन उन्हाळा असल्याने

 घराचा दरवाजा पुढे करुन फिर्यादी घरामध्ये व इतर घरातील लोकं घराचे गच्चीवर जावुन झोपले होते. रात्री अंदाजे २ वा. चे सुमारास चुलत भाऊ गणेश याचा आरडा ओरडाचा

 आवाज आल्याने फिर्यादी चव्हाण झोपेतुन उठुन घराबाहेर आले. त्यावेळी गणेशने कोणीतरी लोकं आले होते ते मला पाहुन पळून गेले आहेत 

असे सांगितल्याने फिर्यादी चव्हाण यांनी घरातील कपाट ठेवलेल्या खोलीत गेले त्यावेळी त्यांना कपाट उघडे दिसले. त्यातील कपडे अस्ताव्यस्त पडले होते. कपाटात पाहिले असता 

कपाटामध्ये ठेवलेले आई वडिलांचे सोने व रोख रक्कम दिसुन आली नाही. त्यावेळी सदर वस्तुचा घरात व घराचे बाहेर आजुबाजुस शोध घेतला असता ते कोठेही मिळून आले नाहीत. 

तसेच फिर्यादी चव्हाण यांचे घराशेजारी राहणारा त्यांचा चुलत भाऊ गणेश चव्हाण याचे घरातील सोने चोरीस गेल्याचे समजले आहे. 

तेव्हा चोरी झाल्याचे खात्री झाल्याने सांगोला पोलीस ठाणेस येवुन अज्ञात चोरट्याविरुध्द तक्रार दिली आहे.

Post a Comment

0 Comments