google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार...पहाटे घुसला प्रेयसीच्या घरात, लाथा-बुक्क्यांनी मारहाणीनंतर तरुणीला चाकूने भोसकलं

Breaking News

धक्कादायक प्रकार...पहाटे घुसला प्रेयसीच्या घरात, लाथा-बुक्क्यांनी मारहाणीनंतर तरुणीला चाकूने भोसकलं

धक्कादायक प्रकार...पहाटे घुसला प्रेयसीच्या घरात, लाथा-बुक्क्यांनी मारहाणीनंतर तरुणीला चाकूने भोसकलं


कर्नाटकात आणखी एका प्रियकराने तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कर्नाटकात नेहा हिरेमठ

 हत्या प्रकरणानंतर आणखी एका तरुणीची प्रेम प्रकरणातून चाकूने भोसकून हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे.

बुधवारी पहाटे २३ वर्षीय तरुणीने २१ वर्षांच्या तरुणीला घरात घुसून चाकूने भोसकलं. तुझंही हाल नेहा हिरेमठ सारखं होईल अशी धमकी त्याने दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सकाळी साडेपाच वाजता मुलीच्या घरात घुसला आणि झोपेतच तिच्यावर हल्ला केला. मुलीला काही 

कळण्याआधीच तिच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. तोपर्यंत तिचे कुटुंबिय आले आणि त्यांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. 

मात्र यानंतरही त्याने चाकूने वार केले. मुलीचा पाठलाग करून निर्घृण हत्या केली. इतकंच नाही तर हत्या करून तो पळून गेला.

पोलिसांनी सांगितले की, हत्या झालेल्या मुलीच्या दोन बहिणी आणि आजी घटनास्थळी होती. त्यांच्यासमोरच तरुणाने तिला भोसकलं.

 घरात तिला फरफटत नेलं आणि लाथाबुक्क्यांनी मारलं. त्यानंतर स्वयंपाक घरात ढकलून तिला चाकूने हल्ला केला. बेंडिगेरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वीरपुरा ओनी भागात ही घटना घडली.

हत्या झालेल्या तरुणीचं नाव अंजली अंबीगेरा असं आहे. तर खून करणाऱ्या तरुणाचं नाव विश्वा असून त्याला गिरीश नावानेही ओळखलं जातं. गिरीशचं अंजलीवर प्रेम होतं.

 तो तिला ब्लॅकमेल करत होता. आई वडिलांना न सांगता म्हैसूरला जाण्यासाठी तो दबाव टाकत होता अशी माहिती समोर येत आहे.

Post a Comment

0 Comments