कोळा जुनोनी परिसरात उन्हाळी सुट्ट्यांत मुलांच्या हाती पुस्तकांऐवजी मोबाइल मोबाइलवर वेळ घालवताना चित्र दिसत आहे...
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील कोळा,जुनोनी डोंगर पाचेगाव किडबिसरी कोळे कराडवाडी कोंबडवाडी तिप्पेहळी गौडवाडी
जुनोनी जुजारपुर हटकर चोपडी नाझरा मंगेवाडी हातीद गौडवाडी ग्रामीण भागातील शालेय परीक्षा संपल्या की उन्हाळ्याच्या
सुट्ट्यांमध्ये मनोरंजनात्मक तसेच ज्ञानवर्धक पुस्तके वाचनाचा छंद विद्यार्थ्यांमध्ये असायचा. कारण 'वाचाल तर वाचाया म्हणीप्रमाणे पुस्तके वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळायचे.
परंतु सध्या लहान मुले दिवसभर हातात मोबाईल घेऊन वेळ घालवत असल्याचे दृश्य दिसून येत आहे. यावर पालकांनी लहान बालकावर लक्ष देऊन मोबाईल पासून दूर ठेवणे गरजेचे बनले आहे.
काळ बदलला तसा वाचनाची आवड कमी झाली.अर्थात आधुनिक युगातील युवकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे, असेच हल्ली दिसून येते.
आज धावपळीच्या युगात जीवन समृद्ध करण्यासाठी वाचनही अत्यंत गरजेचे आहे. जगण्याची उमेद निर्माण करणारे साहित्य वाचणे गरजेचे आहे.
मात्र, हल्ली युवकांना पुस्तके वाचण्याचा कंटाळा येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.केवळ सोशल मीडियावरील जुजबी वाचन युवक करत असल्याने ते भरकटण्याची शक्यता बळावली आहे.
सध्या युवक सर्वाधिक काळ मोबाईलवर तसेच दूरचित्रवाहिणी संचासमोर बसलेले आढळतात. पुस्तकांऐवजी मोबाईलचा मोठया प्रमाणात होऊ लागल्याने गावागावांत वाचनालय असूनही पुस्तकांचे वाचन करत
असलेल्या युवकांची संख्या नगण्य आहे.परिणामी वाचन संस्कृतीच संकटात सापडली आहे. त्यातच देशातील महान कवी, संत, शास्त्रज्ञ, साहित्यिक, लेखक आदींनी
आपले विचार ग्रंथरूपाने आपल्याला दिले आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेणे आवश्यक आहे. अशा पुस्तकांचे युवकांनी वाचन करणे अत्यावश्यक आहे.
पूर्वी खेड्यापाड्यातही युवकांचे वाचनाचे प्रमाण हे मोठे होते. परंतु आता वाचनाला युवा वाचकांची लहान मुलांची संख्या अत्यंत खालावलेली आहे.
0 Comments