google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी... निरा उजवा कालवा दुरुस्तीसाठी बंद; कार्यकारी अभियंता शिवाजीराव जाधव यांची माहिती

Breaking News

मोठी बातमी... निरा उजवा कालवा दुरुस्तीसाठी बंद; कार्यकारी अभियंता शिवाजीराव जाधव यांची माहिती

 मोठी बातमी... निरा उजवा कालवा दुरुस्तीसाठी बंद; कार्यकारी अभियंता शिवाजीराव जाधव यांची माहिती


 (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): रविवार दि. ०५ रोजी निरा उजवा कालवा कि.मी. ४९/९०० सेवा पथाकडील बाजूस मोठा घळ पडून माती मिश्रीत पाणी वाहू लागले होते सदर ठिकाणी १ मी. व्यासाचा व ज्याची खोली मोजता आली नाही

 असा खड्डा पडून पाईपींग सुरू झाले. कालव्याचा विसर्ग कमी करून घळ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतू गळती पुर्णतः बंद झाली नाही. 

या कारणामुळे यांच्या दुरुस्तीसाठी नीरा उजवा कालवा बंद करण्यात आला आहे; अशी माहिती नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजीराव जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत प्रसिद्धी पत्रकात दिलेली अधिक माहिती अशी की; कालव्याचा विसर्ग पुर्ववत केल्यास गळती वाढण्याची शक्यता लक्षात

 घेता व त्याखाली असलेली २००० लोकवस्ती बाधित होऊन मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी होऊ शकते.

 यास्तव, कालवा विसर्ग बंद करून गळती पूर्णतः रोखण्याची कार्यवाही नीरा उजवा कालवा विभाग, फलटण या विभागामार्फत करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments