खळबळजनक ...कोळा, जुनोनी परिसरात फायनान्सकडून महिलांची पिळवणूक
सांगोला : सांगोला तालुक्यातील कोळा, जुनोनी परिसरात अनेक फायनान्स कंपन्या व नामांकित मल्टिस्टेट बँकेच्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज वाटप करण्यात आले,
परंतु या कंपन्यांनी ग्रामीण भागात महिलांसह अनेकांना कर्जाची चांगलीच सवय लावली आहे. या कंपन्यांच्या छुप्या व्याजामुळे अनेकजण कर्जबाजारी होत आहेत.
महिलांना कर्ज द्यायचे, बसुलीसाठी यायचे नाही. बऱ्याच दिवसांनंतर यायचे. कर्जाचा मोठा आकडा झाल्यानंतर वसुलीसाठी तगादा लावून दमबाजों केली
जात असल्याच्याही तक्रारी आहेत. वसुलीसाठी येणारे कर्मचारी महिलांच्या घरी जाऊन नियमबाह्य त्यांचे फोटो काढण्याचा उद्योग करून महिलांना मानसिक त्रास होत असल्याचे दिसत आहे.
अनेकांना दमबाजी करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्यांना अद्दल घडविण्याची मागणी होत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये फायनान्स कंपन्यांचे मल्टिस्टेट बँकेच्या महिलांना बचत गटाचे कर्ज देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढले आहे.
या कंपन्या सुरुवातीला गोडगोड बोलून कर्ज च्यायला भाग पाडत असतात. अडलेले अनेकजण गरजेपोटी याकडे वळत आहेत. एकदा अनेकांच्या बोकांडी कर्ज वसुलीसाठी दमबाजी :
का कर्ज घेतले की या कंपन्या आपला रंग दाखवायला लागतात. व्याज अव्वाच्या सव्या आकारून कर्जदाराला नाकीनऊ आणतात. वसुलीसाठी दमबाजी केली
जात असल्याच्या तक्रारी अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. प्रत्येक भागातील आठ ते दहा महिलांना एकत्र करून त्यांना कर्ज बाटप केले जात आहे.
कंपन्याचे अधिकारी व कर्मचारी महिलांनी कोणत्या कारणासाठी कर्ज घेतले व ते त्याच कारणासाठी वापरले का, याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे बरेच महिला बचत गट अडचणीत आले आहेत.
त्यातही ज्या महिलांच्या घरी गट तयार केला जातो, त्या महिलेला ५०० रुपयांपर्यंत कमिशन दिले जाते. काही महिला दुसऱ्यांना आपल्या नावावर कर्ज काढून देत
असल्याने या महिलेलाही एका कर्ज प्रकरणामागे २००० पेक्षा जास्त कमिशन मिळत असते. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे एखादा कर्जाचा हप्ता भरता येत
नसल्यास त्या महिलेला हे खासगी फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी अरेरावी करुन पैसे भरावेच लागतील,
अशी दमबाजी करत आहेत. यामुळे महिलावर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महिलावर्गाला काम नसल्यामुळे हातात पैसे येत नाहीत, परंतु
पहिल्यांदा गोड बोलून महिलांना या फायनान्स कंपन्यांनी कर्ज दिलेले आहे. यासाठी विविध प्रकारचे शुल्क आकारले आहे.
विमा संरक्षण अशा विविध गोष्टी कर्ज देताना ग्राहकांच्या कर्जातून कट करून कर्ज दिले आहे. परतफेड करण्यासाठी आठवडा, पंधरा दिवस व महिना अशाप्रकारे कर्जाची बसुली केली जात आहे.
कर्ज वसुली करणारे प्रतिनिधी अवमानास्पद भाषेचा वापर करीत आहेत. या भागातील विशेषतः महिलावर्गात या खासगी फायनान्स कंपन्यांची दादागिरी दिसून येत आहे.
अशा वसुली प्रतिनिधींवर कारवाई करण्यात यावी, महिलांचे फोटो काढल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत,
अशी सर्वसामान्य महिलांची मागणी आहे. मायक्रो फायनान्स कंपनीकडून मल्टिस्टेटच्या बँकेकडून कर्ज देताना
महिलांना उद्योग करून महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी कर्ज दिले जाते, असे सांगितले जाते, पण चित्र उलटेच आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्यांची संख्या भरमसाठ बाबू लागली आहे. त्यामुळे महिलाही अनेक कंपन्यांकडून कर्ज घेतात.
त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण होण्यापेक्षा महिला व ते कुटुंब कर्जबाजारी होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.
0 Comments