धक्कादायक..कोल्हापुरात मुलाने केली आईची हत्या ; सुऱ्याने केले वार
कोल्हापुरातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मुलानेच आईचा निर्घृण खून केला आहे. कोल्हापूरच्या साळोखे पार्क परिसरात ही घटना घडली आहे.
सादिक मुजावर असं आरोपी मुलाचं नाव आहे तर शहनाज मुजावर असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. सादिकने आपल्या आईच्या पोटावर, छातीवर आणि पाठीवर सुऱ्यानं वार केला.
या घटनेत शहनाज मुजावर गंभीर जखमी झाल्या, त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सादिक हा आपल्या पत्नीसोबत फोनवर बोलत होता. मात्र त्याची आई मध्येच बोलल्यानं त्याला राग आला,
याच रागाच्या भरात त्याने आपल्या आईची हत्या केली. कोल्हापूरच्या साळोखे पार्क परिसरात कौटुंबिक वादातून हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सादिकने आपल्या आईच्या छातीवर, पोटावर, पाठीवर सुऱ्यानं वार केले, या घटनेत जखमी झालेल्या शहनाज मुजावर यांचा मृत्यू झाला आहे.
0 Comments