google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाऱ्यांना नेमणुकीच्या ठिकाणीच करता येणार मतदान; निवडणूक आयोगाला देणार ईडीसी सर्टिफिकेट

Breaking News

मोठी बातमी..सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाऱ्यांना नेमणुकीच्या ठिकाणीच करता येणार मतदान; निवडणूक आयोगाला देणार ईडीसी सर्टिफिकेट

मोठी बातमी..सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाऱ्यांना नेमणुकीच्या ठिकाणीच करता येणार मतदान;


निवडणूक आयोगाला देणार ईडीसी सर्टिफिकेट
 

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, 

आपले शासकीय कर्तव्य पार पाडता यावे; यासाठी त्यांना निवडणूक आयोगाकडून ईडीसी अंतर्गत मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जर त्याच लोकसभा मतदारसंघातील मतदार यादीत त्या कर्मचाऱ्यांचे नाव असेल आणि त्याची इलेक्शन ड्युटी ही त्याच लोकसभा मतदारसंघात लागलेली असेल तर त्या कर्मचाऱ्यांला नियुक्तीच्या ठिकाणी मतदान करता येणार आहे.

निवडणुकीच्या कामकाजासाठी जवळपास २१ हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यापैकी काही कर्मचारी हे सोलापूर लोकसभा कार्यक्षेत्रात राहणारे आहेत तर काही कर्मचारी हे माढा लोकसभा कार्यक्षेत्रात राहणारे आहेत.

त्यामुळे निवडणूक आयोगाने या कर्मचाऱ्यांची मतदानासाठीची गैरसोय होवू नये, त्यांना सुरळीत मतदान करता यावे आणि आपल्या निवडणूक कामाचे कर्तव्यही बजावता

 यावे यासाठी फॉर्म नंबर १२ अंतर्गत ईडीसी प्रमाणपत्र देवून निवडणुकीच्या ठिकाणीच मतदान करता येणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी लागली आहे. आणि त्यांचे मतदार यादीतील नाव ही सोलापूर लोकसभा मतदारसंघातच येत असेल तर त्यांना ईडीसी प्रमाणपत्र देवून ज्या ठिकाणी त्यांची मतदानासाठी नेमणूक झालेली आहे.

त्याच मतदान केंद्रावर मतदान करण्याची सोय करण्यात आलेली आहे. तीच पध्दत जे कर्मचारी माढा लोकसभा मतदारसंघात राहतात आणि त्यांचे मतदार यादीतील नाव ही माढा लोकसभेसाठी आलेले आहे.

त्या कर्मचाऱ्यांना ही ज्या ठिकाणी इलेक्शन डयुटी लागली आहे. त्याच सेंटरवर ईडीसी प्रमाणपत्र देवून मतदान करता येणार आहे. मात्र अशा मतदारांची स्वतंत्र नोंदणी त्या मतदान केंद्राध्यक्षांना ठेवावी लागणार आहे.

त्या कर्मचाऱ्यांला द्यावे लागणार ईडीसी प्रमाणपत्र

ज्या कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी ज्या लोकसभा मतदारसंघात आली आहे आणि त्याचे मतदार यादीतील नावही त्याच लोकसभेसाठी आले 

असेल तर त्या कर्मचाऱ्यांला ईलेक्शन ड्युटी प्रमाणपत्र देवून ज्याठिकाणी नेमणूक आहे त्याच ठिकाणी मतदान करता येणार आहे.

मात्र अशा मतदारांची स्वतंत्र नोंदणी त्या त्या मतदान केंद्र अध्यक्षांनी ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे ईलेक्शन ड्युटी असली तरी त्यांना त्याच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments