google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अत्यंत दुर्दैवी ! कूलरचा शॉक लागून सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Breaking News

अत्यंत दुर्दैवी ! कूलरचा शॉक लागून सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

अत्यंत दुर्दैवी ! कूलरचा शॉक लागून सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू 


अकोला : राज्यात सगळीकडे उत्साहच प्रकोप पाहायला मिळत असून वाढत्या उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहे. 

उकाड्यापासून दिलासा मिळावा बहुतांश लोक कुलचा वापर करतात. आपण कुलरमध्ये पाणी भरताय? अथवा कूलर सुरू असताना त्याला हात लावताय? 

तर सतर्कता बाळगा. कारण अकोल्यात कुलरच्या विजेचा धक्का लागून एका 7 वर्षीय चिमुकलीला जिव गमवावा लागलाय. युक्ती अमोल गोगे असं या मरण पावलेल्या चिमुकलीचं नाव आहे.

अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांची 7 वर्षीय मुलगी युक्ती ही घरात खेळत असताना कूलरजवळ गेली.

 दरम्यान, कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. युक्तीचे आईवडील आणि कुटुंबीय घरातच होते.

युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

त्यानंतर मात्र गोगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला.या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केलीय. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments