मोठी बातमी.. सांगोल्याचे कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी जाधवर यांनी,
अवैध वृक्षतोड करून विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ट्रकवर केली जप्तीची करून कारवाई !
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी ; सांगोला वनपरिक्षेत्रामध्ये ३ एप्रिल रोजी रात्रीची गस्त घालत असताना रात्री १० वा. च्या सुमारास पंढरपूर-मल्हारपेठ रस्त्यावर
मौजे कटफळ-शेरेवाडी येथे ट्रकची तपासणी केली असता. सदर ट्रक क्र.एम एच ४५ - ०२१७ मध्ये कडूलिंब,आंबा व जांभुळ या झाडांच्या प्रजातीचे जळावु लाकुड १९.०२८ घनमीटर लाकूड विनापरवाना
वाहतूक होत असल्याचे दिसुन आले. ट्रक ड्राव्हर रामकृष्ण भानुदास शिंदे रा. सांगोला यांचेकडे वनविभागाचा वाहतूक पास नसल्यामुळे सदरचा ट्रक लाकुड मालासह
जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सांगोला शेजारी ठेवण्यात आला आहे. वनरक्षक कटफळ यांचा प्र.गु.क्र.ओ-०१/२०२४ दि.०३/०४/२०२४ नुसार नोंद केला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला कार्यालयाकडून वृक्षतोड परवाना व वाहतूक पास परवाना न घेतल्याने कावाई करण्यात आली. सदरची वृक्षतोड मालकी क्षेत्रातील आहे. त्याचा तपास चालू आहे.
ट्रक मधील जळावू लाकडाची किंमत अंदाजे 40,000/- रु. आहे. वनविभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी. व वनविभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी.
अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आव्हान श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे.
प्रत्येक व्यक्तीने झाडांचे संरक्षण करावे. ज्या झाडापासुन धोका आहे अशी झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा.
पर्यावरण जतन करण्यासाठी माणसाला ऑक्सीजन प्राणवायु लागतो त्यासाठी सर्वांनी झाडाचे संरक्षण करावे. सदरची कारवाई मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे- श्री.एन.आर.प्रवीण साहेब, व मा. उपवनसंरक्षक,
सोलापूर श्री. धैर्यशील पाटील व मा. सहा वनसंरक्षक (कॅम्पा), सोलापूर श्री.बी.जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरची कारवाई श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला,
श्री.एस.एल. मुंढे वनपाल सांगोला वनरक्षक सांगोला श्री.जी.बी. व्हरकटे, वनरक्षक कटफळ श्री.आर. व्ही. कवठाळे तसेच वनमजूर दबडे, आटपाडकर व हांडे यांनी केली.


0 Comments