खळबळजनक घटना...पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या
राज्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आज पहाटे पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने लोहिया नगर येथील पोलीस चौकीत पोलिसाने जीवनयात्रा संपवली.
भारत दत्ता अस्मर असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. अस्मर याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अस्मर याने चार राउंड फायर करत आत्महत्या केली आहे.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. रात्री ड्युटीवर असताना लोहियानगर पोलिस चौकीच्या वरती असलेल्या रेस्टरूममध्ये अस्मर याने गोळी झाडून आत्महत्या केली.


0 Comments