माढा लोकसभेसाठी हरिभाऊ पाटील यांना महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी
शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२
सांगोला (प्रतिनिधी): माढा लोक सभा मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते हरिभाऊ नारायण पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.
हरिभाऊ पाटील यांना उमेदवारी दिल्यास माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाची मत संख्या लक्षणीय असल्याने मतदारांमध्ये चैतन्य निर्माण होऊन
भारत देशातील धनगर समाजाचा पहिला लोकसभा खासदार निवडला जाईल. त्यामुळे देशात नवा इतिहास घडेल.
तसेच हरिभाऊ पाटील हे गेली ४० वर्षे समाजकारणाच्या माध्यमातून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करीत असून त्यांनी अनेक ज्वलंत प्रश्नांच्या संदर्भाने यशस्वी लढा दिलेला आहे. त्यांची उमेदवारी म्हणजे वंचित भटके
विमुक्त बहुजन अल्पसंख्यांक अशा तमाम माढा वासियांची सन्मानाने गौरविलेली उमेदवारी तसेच यापूर्वीचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यपद्धती विषय मतदार संघामध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांना आपल्या स्वतःमध्ये
मिसळणारा व आपल्या हक्काचा आपल्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणारा खऱ्या अर्थाने जनमानसाचा आवाज होऊ शकतो अशा उमेदवाराची निकड असताना हरिभाऊ पाटील हे समर्थ पर्याय आहेत.
महाविकास आघाडीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन माढा मतदारसंघांमध्ये यश मिळवण्यासाठी हरिभाऊ पाटील यांना महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी, असे मत सांगोला तालुका अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सादिक शेख यांनी व्यक्त केले आहे.
0 Comments